Virat Kohli  esakal
क्रीडा

टी 20 चे नेतृत्व सोडलं अन् वनडेत ते गमावलं, विराटने सांगितले काय काय घडलं?

टी 20 चे नेतृत्व सोडताना नक्की काय झाले?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : गेल्या दहा पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या विराट - रोहित वादावर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) प्रतिक्रिया दिली. याचबरोबर विराट कोहलीने ज्यावेळी त्याने टी 20 (T20 Cricket) संघाचे नेतृत्व सोडले त्यावेळी बीसीसीआयबरोबर (BCCI) झालेल्या चर्चेदरम्यान काय काय झाले होते याचा खुलासा देखील केला. विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 चे नेतृत्व स्वतःहून सोडले. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (BCCI President Sourav Ganguly)याबबात बोलताना म्हणाला होता की मी विराट कोहलीला संघाचे नेतृत्व सोडू नको असे सांगितले होते.

आजच्या पत्रकार परिषदेत (Press Conference) विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 कर्णधारपद (Virat Kohli Captaincy) सोडताना बीसीसीआय बरोबर काय चर्चा झाली याचा देखील खुलासा केला. विराट कोहलीने सांगितले की, ज्यावेळी मी टी 20 संघाचे (T20 Team) नेतृत्व सोडले त्यावेळी बीसीसीआय आणि माझ्यामधील संवादात कोणताही अडचण निर्माण झाला नाही. विराट म्हणाला, 'ज्यावेळी मी बीसीसीआयला टी 20 संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे सांगितले त्यावेळी हा निर्णय चांगल्या प्रकारे स्विकारला गेला होता. त्यात कोणताही अडचण निर्माण झाली नाही. मला सांगण्यात आले की हा एक भविष्यासाठी महत्वाचा निर्णय आहे.'

विराट पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी मी माझा निर्णय सांगितला त्यावेळी मी एकदिवसीय आणि कोसटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले होते. माझ्या बाजूने माझे म्हणणे मी स्पष्टपणे सांगितले होते. पण, बीसीसीआय अधिकारी आणि निवड समितीला मी हेही सांगितले होते की जर तुम्हाला वाटते की मी इतर फॉरमॅटमध्ये (ODI & Test) नेतृत्व करु नये तर याला माझी काही हरकत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT