Virat Kohli
Virat Kohli 
क्रीडा

"विराटने संघाचं कर्णधारपद सोडलं याचं आश्चर्य वाटलं नाही, पण.."

विराज भागवत

माजी निवड समिती अध्यक्षांनी व्यक्त केलं मत

Virat Kohli Stepped down from T20 Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने T20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टीम इंडियाचा कर्णधार बदलणार अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. विराट कसोटी कर्णधार असेल तर T20 आणि वन डेमध्ये रोहितकडे कर्णधारपद असेल. या चर्चांना काल पूर्णविराम मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने T20 विश्वचषक 2021 नंतर T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. कामाच्या ताणामुळे हा निर्णय घेतल्याचे तो ट्विटमध्ये म्हणाला. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावर, माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले.

"विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडणं ही फारशी आश्चर्याची गोष्ट नाही. पण त्याने ज्या वेळी हा निर्णय जाहीर केलाय, ती बाब थोडीशी आश्चर्यजनक आहे. टी२० विश्वचषक स्पर्धा अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत ही घोषणा करणे जरा विचित्र आहे. कदाचित विराट कोहलीला बायो बबलच्या वातावरणाचा वीट आला असावा. गेले काही महिने त्याची फलंदाजी योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसत आहे. तसेच, मैदानावरील त्याच्या देहबोलीतही काहीसा फरक पडला असल्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत कदाचित त्याची विचारसरणी बदलली असावी. आणि म्हणून त्याने हा निर्णय घेतला असावा", अशा भावना प्रसाद यांनी व्यक्त केल्या.

विराटचे बालपणीचे प्रशिक्षक काय म्हणाले...

"विराटने कर्णधारपद सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खूपच विचारपूर्वक घेतला आहे. त्याने या निर्णयाआधी माझ्याशीही चर्चा केली होती. तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करायचे हा विचार कोणत्याही खेळाडूला दडपणाखाली ठेवतो. त्यामुळेच त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझा त्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे", असे विराटचे बालपणीचे प्रशिक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: संतापजनक! पोर्शे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या; पोलीस आयुक्तांनी घेतली दखल

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update: मुंबईतल्या संथ मतदानाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

Mumbai Election: मतदानादिवशी ढिसाळ कारभार, सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री शिंदेंकडून चौकशीचे आदेश

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

SCROLL FOR NEXT