Virat-Kohli-Irfan-Pathan 
क्रीडा

विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर इरफान म्हणतो...

विराज भागवत

कोहली विश्वचषकानंतर सोडणार टी२० संघाचे कर्णधारपद

Virat Kohli Stepped Down as T20 Captain: भारतीय टी२० आणि वन डे संघाचा कर्णधार बदलणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. विराट केवळ कसोटी कर्णधार असेल, तर रोहित शर्माकडे टी२० आणि वन डे संघाचे कर्णधारपद दिले जाईल, अशी चर्चा रंगली होती. BCCI ने या चर्चा नाकारल्या होत्या, पण अखेर विराट कोहली गुरूवारी संध्याकाळी टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर पदावरून पायउतार होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. विराटच्या या निर्णयावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने मत मांडले.

"विराटने ज्या वेळी हा निर्णय जाहीर केलाय, त्याबद्दल मला आश्चर्य वाटतंय. सहसा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा एखाद्या स्पर्धेच्या नंतर जाहीर केला जातो. आता जर आपण टी२० विश्वचषक जिंकलो तर पुढे काय होणार, याचा मी विचार करतोय. विराट हा एक उत्तम नेता आहे. त्याच्याकडे चांगले नेतृत्वकौशल्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपले नेतृत्वगुण दाखवले आहेत. ICCच्या एकाही बड्या स्पर्धेचे विजेतेपद त्याला अद्याप मिळवता आलेले नाही. यावरून त्याला नेहमीच प्रश्न विचारले जातील. पण मला खात्री आहे की विराटने हा निर्णय नीट विचार करूनच घेतला असेल. असे निर्णय घेणं हे कठीण असतं. विराटने विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी उंचावून कर्णधारपद सोडावं अशीच साऱ्या भारतीयांची इच्छा आहे", अशा शब्दात इरफान पठाणने आपल्या भावना व्यक्त केल्या.

विराटचा निर्णय भारतासाठी फायद्याचाच!

"नवा कर्णधार कोण असेल याची नक्कीच साऱ्यांना उत्सुकता आहे. ज्याप्रमाणे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला नेतृत्वात मदत केली, तसाच विराटही नव्या कर्णधाराला नक्की मदत करेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विराटने विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्याच्या या निर्णयाचा टीम इंडियाला फायदाच होईल. कारण कोणताही कर्णधार उंचीवर असताना पद सोडण्यास उत्सुक असतो. त्यामुळे विश्वचषक जिंकून पद सोडायचं असा विचार विराट करत असेल. आणि त्यामुळे तो सर्वोत्तम कामगिरी करेल", असे विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT