Virat Kohli T20I Rohit Sharma esakal
क्रीडा

Virat Kohli : कोहली पाकविरूद्धच्या समन्यात आहे एका खास 'शतका'च्या उंबरठ्यावर

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Asia Cup T20 : आशिया कप सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यात सर्वांची नजर ही विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहे. त्याने हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात 59 धावांची खेळी करत आपण पुन्हा फॉर्ममध्ये येत असल्याचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे विराट कोहली पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात टी 20 क्रिकेटमधील एक खास माईल स्टोर पार करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

विराट कोहली टी 20 क्रिकेटमध्ये एक खास शतक (100 Sixes In T20I ) पूर्ण करण्यापासून तीन पावले दूर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 101 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 93 डावात आतापर्यंत 97 षटकार मारले आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने 3 षटकार मारले तर तो टी 20 मध्ये षटकारांचे शतक पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील होईल. विराट कोहलीने आशिया कपमधील दोन सामन्यात चार षटकार मारले आहेत. त्याने पाकिस्तानविरूद्ध एक आणि हाँगकाँग विरूद्ध तीन षटकार मारले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे. त्याने सर्वाधिक 172 षटकार मारले आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 165 षटकार मारले आहेत. तर या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने 75 डावात 124 षटकार मारले आहेत. आतापर्यंत 9 फलंदाजांनी टी 20 क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि वेस्ट इंडीजच्या किरॉन पोलार्डने प्रत्येकी 99 षटकार मारले आहेत. विराट कोहलीला या दोघांनी मागे टाकण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT