Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : शाकाहारी विराटने खाल्लेला ‘मॉक चिकन टिक्का’, हे नेमकं आहे तरी काय?

विराटने ‘मॉक चिकन टिक्का’ खातानाचा फोटो शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Virat Kohli Post Viral : भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली हा त्याच्या अप्रतिम खेळासाठी आणि सोशल मीडियावरील पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली कोणतीही पोस्ट लगेच व्हायरल होते.

विराटने शेअर केलेल्या पोस्ट चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. नुकतीच त्याने एक इन्स्टास्टोरी शेअर केली होती. या इन्स्टास्टोरीमध्ये त्याने एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. परंतु, त्याच्या या फोटोमुळे चाहते मात्र, पुरते गोंधळात पडले आहेत.

खरे तर कोहलीने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये ‘मॉक चिकन टिक्का’ खातानाचा फोटो शेअर केला आहे. खरे तर विराट हा मागील कित्येक दिवसांपासून शाकाहारी आहे आणि त्याने शेअर केलेला हा फोटो ‘मॉक चिकन टिक्का’ खातानाचा आहे. यासोबतच त्याने मॉक चिकन टिक्काचे भरपूर कौतुक केले आहे. मात्र, विराटचा हा फोटो पाहून चाहते मात्र, गोंधळून गेले आहे.

मॉक चिकन टिक्का आहे तरी काय?

खरं तर कोहलीने शेअर केलेला हा फोटो ‘मॉक चिकन टिक्का’ खातानाचा आहे. परंतु, खरी गंमत तर अशी आहे की, या मॉक चिकन टिक्क्यामध्ये चिकन अजिबात नसते. परंतु, याची चव अगदी नॉनव्हेज चिकन टिक्क्यासारखी लागते.

Virat Kohli

मॉक चिकन टिक्का हे सोया प्रोटीन, गव्हाचे ग्लूटेन, टेक्सचर्ड व्हेजिटेबल प्रोटीन आणि मटार प्रोटीनपासून बनवले जाते. कोहलीने खाल्लेले हे ‘मॉक चिकन टिक्का’ १००% प्लॅंट बेस्ड डिश आहे. जी हुबेहूब चिकनसारखी लागते मात्र, यात चिकन अजिबात नसते.

विराट कोहलीने २०२१ मध्ये एक पोस्ट शेअर करत स्वत:ला शाकाहारी घोषित केले होते. विराट अजिबात नॉनव्हेज खात नाही, तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील शाकाहारी आहे.

कोहलीने ही नुकतीच शेअर केलेली मॉक चिकन टिक्काची स्टोरी पाहून चाहते थक्क झाले. कारण, कोहली नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे, त्याने नॉनव्हेज खायला सुरूवात केली आहे का? असे प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT