Virat Kohli Wanindu Hasaranga Jump In ICC T20 Players Ranking esakal
क्रीडा

Virat Kohli : RCB च्या पठ्ठ्यांनी ICC T20 Ranking मध्ये घेतली चांगलीच उसळी

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 Players Ranking Virat Kohli : आशिया कपमधील दमदार कामगिरीचा फायदा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आयसीसी टी 20 क्रमवारीमध्ये झाला आहे. विराट कोहलीने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात 122 धावांची दमदार खेळी केली होती. विराटने जवळपास तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. तो आशिया कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आशिया कपमध्ये त्याने दोन अर्धशतकेही ठोकली होती. याचा फायदा त्याला टी 20 बॅट्समन क्रमवारीमध्ये झाला. त्याने 14 स्थानांची उडी घेतली.

विराट कोहलीने आशिया कपमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी 20 शतक ठोकले. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 276 धावा केल्या. याचबरोबर त्याने आयसीसी टी 20 बॅटिंग क्रमवारीत 29 व्या स्थानवरून उडी घेत 15 वे स्थान पटकावले. टी 20 बॅटिंग क्रमवारीत चौथ्या स्थानवर असलेला सूर्यकुमार यादव हा टॉप 10 मधला एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याची टी 20 क्रमवारी 4 दुसरीकडे श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) देखील आशिया कप गाजवला. त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील देण्यात आला.

वानिंदूने स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आयसीसी टी 20 बॉलिंग क्रमवारीमध्ये तीन स्थानांची उसळी घेतली असून तो सहाव्या स्थानावर पोहचला आहे. अंतिम सामन्यात आक्रमक 36 धावांची महत्वपूर्ण खेळी करणाऱ्या हसरंगाने अष्टपैलू म्हणून देखील आपले टी 20 क्रमवारी सुधारले आहे. त्याच्या क्रमवारीमध्ये सात स्थानांची सुधारणा झाली असून तो आता अष्टपैलूंच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. विराट कोहली आणि वानिंदू हसरंगा हे दोघेही रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळतात. आयसीसी अष्टपैलू टी 20 क्रमवारीमध्ये शाकिब अल हसन पहिल्या तर मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT