Virat Kohli 1st T20I Afghanistan esakal
क्रीडा

Virat Kohli : राहुल द्रविडने विराट कोहलीबाबत दिली मोठी अपडेट; वैयक्तिक कारणामुळं...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli 1st T20I Afghanistan : रन मशिन विराट कोहलीने 2022 च्या टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय टी 20 संघात पुनरागमन केलं. मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यासाठी विराट कोहली उपलब्ध असणार नाही. याबाबतची माहिती प्रशिक्षक राहुल द्रविडने आज पत्रकार परिषदेत दिली. विराट जरी पहिल्या टी 20 सामन्यासाठी उपलब्ध नसला तरी तो दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी झालेल्या पत्राकार परिषदेत राहुल द्रविडला श्रेयस अय्यर आणि इशान किशनची निवड न होण्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राहुलने या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याचे वृत्त धुडकावून लावत त्या खोट्या बातम्या असल्याचं सांगितलं.

राहुल द्रविड म्हणाला की, 'श्रेयस अय्यर संघात नाही कारण संघात जास्त फलंदाज होत होते. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. ते वृत्त खोटं आहे.'

याचबरोबर द्रविडने सांगितले की इशान किशनने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता. म्हणूनच त्याला अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT