Virender Sehwag’s Son Aaryavir 
क्रीडा

Virender Sehwag Son : 'सर्वत्र घराणेशाही!' सेहवागचा मुलगा खेळणार दिल्लीच्या संघात

''बॉलिवूड प्रमाणेच सर्वत्र आता घराणेशाही''

Kiran Mahanavar

Virender Sehwag’s Son Aaryavir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आता क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. आर्यवीर सेहवागची भारतीय क्रिकेट कंट्रोल (BCCI) तर्फे आयोजित अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड करण्यात आली आहे. आर्यवीर 15 वर्षांचा असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज आहे. 15 वर्षीय आर्यवीरला 16 वर्षांखालील संघात स्थान मिळाल्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहते म्हणत आहे की सर्वत्र घराणेशाही सुरू आहे.

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला अंडर-16 संघात स्थान मिळाल्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊया. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत त्याच्या कुटुंबाला बॉलिवूडमध्येच सहज काम मिळत होते. त्याचबरोबर क्रिकेटमध्येही त्याची सुरुवात झाली आहे. सर्वत्र घराणेशाही सुरू झाल्याचेही काही चाहते सांगतात. चाहत्यांचे म्हणणे आहे की, नेपोटिझम म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पदाचा किंवा शक्तीचा वापर करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना पद किंवा नोकरी मिळवून देते.

आर्यवीर हा उजव्या हाताचा फलंदाज असून वडिलांप्रमाणेच स्फोटक फलंदाजीवर विश्वास ठेवतो. आर्यवीरची फलंदाजीची शैली काहीशी वीरेंद्र सेहवागसारखी आहे. आर्यवीर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या व्यायामाचे व्हिडिओ शेअर करत असतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली हा आर्यवीरचा आवडता खेळाडू आहे. त्याने इंस्टाग्रामवर कोहलीचा एकत्र एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने विराट कोहलीला आपला आवडता खेळाडू असे वर्णन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT