Virender Sehwag hails Dinesh 
क्रीडा

'अभी खेलने का नही *** का...' कार्तिकच्या खेळीवर सेहवागचे ट्विट व्हायरल

माजी क्रिकेटपटूने दिनेश कार्तिकचे केले कौतुक

Kiran Mahanavar

IND vs SA in 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना राजकोट सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 चेंडूत 55 धावा केल्या. कार्तिकच्या खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव केला आणि मालिकेचा निकाल पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यावर नेला. कार्तिकच्या खेळीने माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले आहे. त्याने 37 वर्षीय खेळाडूचे कौतुक केले आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरी सोशल मीडियाच्या खेळपट्टीवर सेहवाग अधून-मधून चौकार षटकार मारत असतो. कालच्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि आवेश खान भारताच्या विजयाचे खरे नायक ठरले आहे. कार्तिकने 55 धावा केल्या, तर आवेश खानने चार षटकात चार बळी घेतल्या. सामना संपल्यानंतर सेहवागने असे काही ट्विट केले आहे, जे सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.

वीरेंद्र सेहवागने 'स्कॅन 1992' या प्रसिद्ध वेब सिरीजमधील हर्षद मेहताचा एक मीम शेअर केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, अब चलने का नहीं *** का टाइम आया है. कार्तिकचे हे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले, आणि पहिल्या तीन सामन्यात विकेटलेस राहिल्यानंतर आवेशच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते पण टीम इंडियाने स्टाईलने हा सामना जिंकला आहे.

दिनेश कार्तिकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 बाद 169 धावा केल्या, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 16.5 षटकांत केवळ 87 धावांत रोखून सामना 82 धावांनी जिंकला. पाच सामन्यांची मालिका सध्या 2-2 अशी बरोबरी केली आहे. शेवटचा सामना 19 जून रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT