Virender Sehwag Share 19 Year Old India Pakistan Match Incidence When Sachin Abused By Shahid Afridi Paid Shoaib Akhtar  esakal
क्रीडा

Virender Sehwag : आफ्रिदी अपमान करत होता, सचिन अख्तरला ठोकत होता; सेहवागने सांगितला 19 वर्षापूर्वीचा किस्सा

अनिरुद्ध संकपाळ

Virender Sehwag : भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना हा कायम हाय व्होल्टेज सामना असतो. आता 28 ऑगस्टला आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारत पाकिस्तान सामन्याची परवणी क्रिकेट चाहत्यांना पहावयास मिळणार आहे. दरम्यान, या दोन सामन्यांची चाहते चातकासारखी वाट पाहत असताना विरेंद्र सेहवागने भारत पाकिस्तान सामन्यातील एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. (Virender Sehwag Share 19 Year Old India Pakistan Match Incidence When Sachin Abused By Shahid Afridi Paid By Shoaib Akhtar)

विरेंद्र सेहवागने 2003 च्या वनडे वर्ल्डकपमधील लीग स्टेजमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यातील एक किस्सा सांगितला. या सामन्यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 75 चेंडूत 98 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्याने शोएब अख्तरच्या पहिल्याच षटकात 18 धावा चोपून त्याची बॉलिंग बंद केली होती. भारताने पाकिस्तानचे 274 धावांचे आव्हान सहा विकेट राखून पार केले होते. मात्र या सामन्यात सचिन तेंडुलकरला रनर घ्यावा लागला होता.

या सामन्याबाबत बोलताना विरेंद्र सेहवाग म्हणाला की, 'सचिन तेंडुलकरच्या पायात गोळे येत होते. त्यामुळे त्याने मला रनर म्हणून मैदानावर परत बोलवले. दरम्यान, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी सचिन तेंडुलकरचा सातत्याने अपमान करत होता. तो सतत काही ना काही बोलत होता. मात्र सचिन तेंडुलकरची एकाग्रता ढळली नव्हती. त्याला माहिती होतं की त्याचं क्रीजवर असणं किती महत्वाचं आहे. तो सहसा रनर घेत नव्हता. मात्र त्यावेळी त्याने मला मैदानात रनर म्हणून बोलवले. त्याला माहिती होतं की मी त्याच्या सारखाच धावेन. आमच्यामध्ये कोणताही गोंधळ होणार नाही.'

विरेंद्र सेहवाग स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हणाला की, 'मला आठवते की त्यावेळी शोएब अख्तरने एक वक्तव्य केले होते की तो भारताची टॉप ऑर्डर उद्धवस्त करणार आहे. मी हे वक्तव्य वाचले नव्हते. सचिननेही वाचले नव्हते. मात्र सचिनने त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. डावातील पहिल्याच षटकात त्याने 18 धावा ठोकल्या. यामुळे कर्णधाराला अख्तरची बॉलिंग बंद करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT