Virender Sehwag Statement About Anil Kumble esakal
क्रीडा

कुंबळे सेहवागला म्हणला होता, कर्णधार आहे तोपर्यंत तू संघात राहशील

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामावीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) भारताचा माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळेबद्दल (Anil Kumble) एक किस्सा सांगितला. सेहवागने 2007 - 08 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी (Australia Tour) अनिल कुंबळेने विरेंद्र सेहवागला मोठे आश्वासन दिले. विरेंद्र सेहवागने जवळपास 100 कसोटी सामने खेळून 8 हजार 500 धावा केल्या आहेत. मात्र 2007 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो भारताच्या कसोटी संघात बसत नव्हता. मात्र त्याला अनिल कुंबळेच्या नेतृत्वातील (Captain) संघात दौऱ्यासाठी स्थान मिळाले. मात्र पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

विरेंद्र सेहवाग 2007 - 08 च्या दरम्यान जवळपास एक वर्ष भारतीय कसोटी संघातून बाहेर होता. संघातून बाहेर असण्याची सल त्याच्या मनात होती. याबाबत तो म्हणाला की, 'अचानक मला जाणीव होऊ लागली की मी कसोटी संघात नाहीये. जर मला संघातून वगळले नसते तर मी कसोटीत 10 हजार पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज झालो असतो.'

यानंतर सेहवागने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी घडलेला किस्सा सांगितला. तो म्हणाला की, पर्थ कसोटीपूर्वी कर्णधार अनिल कुंबळेने मला सराव सामन्यात अर्धशतक करण्यास सांगितले होते. कुंबळे 'या सामन्यात 50 धावा कर त्यानंतर तुला पर्थ कसोटीत संधी देईन.' असे म्हणाल्याचे सेहवागने सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या चौथ्या सामन्यात अॅडेलेडमध्ये सेहवागने पहिल्या डावात 63 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने सामना वाचवणारी 151 धावांची दमदार खेळी केली. याबाबत सेहवाग म्हणाला, 'त्या 60 धावा या माझ्या आयुष्यातील सर्वात कठिण धावा होत्या. मला अनिलभाईचे ऋण फेडायचे होते. मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन गेला म्हणून अनिल कुंबळेकडे कोणी बोट दाखवू नये असे वाटत होते.'

सेहवाग पुढे म्हणाला, 'मी स्ट्राईकवर होतो त्यावेळी एकाग्रतेने खेळत होतो. तर नॉन स्ट्राईकरला आलो की अंपायरबरोबर गप्पा मारणे गाणी म्हणणे असले उद्योग सुरू होते. यामुळे माझ्यावरचा दबाल नाहिसा झाला.' या मालिकेनंतर अनिल कुंबळेने सेहवागला आश्वासन दिलं की जोपर्यंत तो भारतीय संघाचा कर्णधार असेल तोपर्यंत तुला संघातून वगळण्यात येणार नाही. सेहवाग म्हणाला, 'एखाद्या खेळाडूला त्याच्या कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास असणं हे हवं असतं. मला कारकिर्दिच्या सुरूवातीला सौरभ गांगुलीचा आणि नंतर अनिल कुंबळेचा पाठिंबा मिळाला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT