World Athletics Championship esakal
क्रीडा

"क्या फेंकता है.." वीरेंद्र सेहवागने नीरजला खास शैलीत दिल्या शुभेच्छा

धनश्री ओतारी

"क्या फेंकता है.." म्हणत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ऐतिहासीक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ( World Athletics Championship)

नीरज चोप्राने वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याच्या या ऐतिहासीक कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

वीरेंद्र सेहवागने ट्विट करत नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्याने नीरजला खास संदेशही दिला आहे. (virendra sehwag congratulates neeraj chopra on world championships silver)

'आजपासून काही वर्षांनी तरुणांची एक पिढी येणार आहे ज्यांच्यासाठी "क्या फेंकता है" ही एक मोठी प्रशंसा ठरणार आहे, या चॅम्पियन नीरज चोप्राचे आभार. पुन्हा एकदा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकासह भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी.'

अशा आशयाची पोस्ट सेहवागने केली आहे. जी सध्या चर्चेत आहे.

यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१३ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. यापूर्वी २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने भारतासाठी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकमेव पदक जिंकले होते. पॅरिस येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीत त्याने कांस्यपदक पटकावले.

'आपल्या देशाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज चोप्राने मोठे यश संपादन केले आहे. या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरज चोप्राला त्याच्या पुढील स्पर्धेसाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा.' अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीनी नीरज चोप्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT