vvs laxman head coach of indian team first t20 against england rahul dravid sakal
क्रीडा

ENG vs IND : टी-20 सामन्यात द्रविड ऐवजी लक्ष्मणच असणार मुख्य प्रशिक्षक

व्हीव्हीएस लक्ष्मण होणार भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक!

Kiran Mahanavar

इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात 7 जुलैपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियासाठी याआधी आता मोठी बातमी समोर आली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड पहिल्या टी-20 सामन्यात संघासोबत नसणार आहे. त्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात VVS लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.(vvs laxman head coach of indian team first t20 against england rahul dravid)

इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना 5 जुलैला संपणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी 7 जुलैला टी-20 सामना होणार आहे. या पहिल्या सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि पंत खेळणार नाहीत.

जूनच्या अखेरीस टीम इंडियाने आयर्लंडचा दौरा केला. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आयर्लंडचा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाचा त्या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मणवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पहिल्या टी-20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जॅस्पीनो बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा, मोहम्मद शमी, शमी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT