VVS Laxman  PTI
क्रीडा

राहुल द्रविडची जागा घेण्यास VVS लक्ष्मणचा नकार, वाचा सविस्तर

विराज भागवत

BCCI च्या अधिकाऱ्यांची लक्ष्मणशी बैठक केल्याची चर्चा

भारतीय संघाचा आजपासून टी२० विश्वचषक २०२१चा प्रवास सुरू होत आहे. आज इंग्लंडविरूद्ध आणि २० तारखेला ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर २४ तारखेला भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात टीम इंडिया खऱ्या प्रवासाला सुरूवात होईल. या स्पर्धेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांचा काही सपोर्ट स्टाफ आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. रवी शास्त्रींच्या जागी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा विचार जवळपास निश्चित झाला आहे. पण द्रविड सध्या जे पद भूषवत आहे त्या पदासाठी BCCI नवा उमेदवार शोधत असून त्यास व्हीव्हीएस लक्ष्मणने नकार दिला आहे.

राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. मात्र, त्याला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर आल्याने ही जागा रिक्त होत आहे. अशा परिस्थितीत BCCI कडून या पदासाठी भारताचा दिग्गज कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याला विचारण्यात आले होते. पण त्याने या पदासाठी नकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. द्रविड टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदावर रूजू होणार आहे. त्यामुळे BCCI ला महिन्याभराच्या कालावधीत ही रिक्त जागा भरायची आहे. लक्ष्मण हा गेल्या काही वर्षांपासून सनरायजर्स हैदराबाद या संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष्मण याच या जागेचा उत्तम पर्याय असल्याचे BCCI चे मत आहे. पण लक्ष्मणने मात्र यास नकार दिला असल्याने आता BCCI पुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

Rahul Dravid

दरम्यान, टी२० विश्वचषक स्पर्धा ही रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर शास्त्री आणि इतर सपोर्ट स्टाफ आपल्या पदावरून दूर होणार आहेत. याशिवाय, भारताचा कर्णधार विराट कोहली हा देखील आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. त्याने आधीच याबद्दची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत नव्या ढंगात पुन्हा टीम इंडियाची मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT