Washington Sundar Corona Positive esakal
क्रीडा

वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण; आफ्रिका दौऱ्याला मुकणार?

अनिरुद्ध संकपाळ

बेंगळूरु : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली असून यामुळे आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १९, २१ व २३ जानेवारी यादरम्यान पार्ल व केपटाऊन येथे तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.(Washington Sundar Corona Positive)

तमिळनाडूचा २२ वर्षीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला बेंगळूरुत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो अद्याप भारतीय वन डे संघातील क्रिकेटपटूंशी मुंबईत जोडला गेलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी (South Africa ODI Series) निवडण्यात आलेले भारतीय क्रिकेटपटू एक किंवा दोन दिवसांत तिथे रवाना होणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांकडून वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले, पण तो आगामी मालिकेत खेळणार की नाही याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. तसेच त्याच्याऐवजी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात येईल या प्रश्‍नाचे उत्तरही गुलदस्त्यात आहे.

इतर खेळाडूंसोबत जाणार नाही

वॉशिंग्टन सुंदरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याचा अर्थ तो किमान सात दिवस विलगीकरणात राहणार आहे. वन डे मालिकेसाठी निवडण्यात आलेले क्रिकेटपटू एक ते दोन दिवसांत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या खेळाडूंसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार नाही हे निश्‍चित आहे, पण तो एकटा जाणार आहे की नाही याबाबतही बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT