Wasim Akram  esakal
क्रीडा

Wasim Akram : जगासमोर अपमान करून घेण्याचा... अक्रमने केली चेंडू तपासण्याचं वक्तव्य करणाऱ्याची खरडपट्टी

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Akram : भारतीय गोलंदाजांनी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या दमदार गोलंदाजीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. भारताचे मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकूट सध्या प्रत्येक संघाच्या मानत धडकी भरवत आहे.

नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 357 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या श्रीलंकेचा भारतीय गोलंदाजांनी 55 धावात खुर्दा उडवला होता. मोहम्मद शामीने 5 विकेट्स घेतल्या होत्या तर सिराजने 3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांची ही भन्नाट कामगिरी पाकिस्तानच्या माजी खेळाडू हसन रझाच्या पचनी पडली नव्हती. त्याने पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर अकलेचे तारे तोडत भारताला आयसीसी विशेष चेंडू देत फेव्हर करत असल्याचे वक्तव्य केलं होतं.

आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमनेच त्याला घरचा आहेर दिला आहे. वसिम अक्रम हसन रझाच्या वक्तव्यावर म्हणाला, 'तू स्वतःचा अपमान स्वतःच करून घेतला आहेसच. मात्र तू संपूर्ण जगासमोर आमचा देखील अपमान का कर आहेस. सर्वात प्रथम मैदानात अपायर्स, सामना अधिकारी आणि बरेच लोक स्टेडियममध्ये असतात.'

'दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान किंवा दुसरी कोणतीही गोष्ट कशी काय चेंडूचा स्विंग कमी जास्त करू शकते. भारतीय गोलंदाज जगात भारी आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ता आणि कौशल्य आहे. त्यामुळेच ते इतर गोलंदाजांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा केंद्राचा निर्णय

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

Pali News : पतीदेव झाले कारभारी! पाच्छापूर सरपंचांच्या पतीचा ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप, आर्थिक लाभही घेतले

SCROLL FOR NEXT