Kyle Jamieson esakal
क्रीडा

IND vs NZ : जाफर म्हणतोय जेमिसनचा वानखेडेतील प्रवेश नाकारा

जेमिसनला रोखण्यासठी जाफरने सांगितली भन्नाट ट्रिक

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरच्या ( Wasim Jaffer ) सोशल मीडियावरील पोस्टची कायम चर्चा होत असते. जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात तर सोशल मीडियावर वॉरच सुरु असते. आता मुंबईत सुरु असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासंदर्भात वासिम जाफरने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या काइल जेमिसनने ( Kyle Jamieson ) भेदक मारा करत भारतीय फलंदाजांना मायदेशात चांगलेच हैराण केले. त्यामुळे वानखेडेवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना काइल जेमिसनचा यशस्वी सामना करण्यासाठी खास रणनिती आखावी लागणार आहे. ( IND vs NZ 2nd Test )

दरम्यान, भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने काइल जेमिसनला रोखण्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे. त्याने आपल्या कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटात एका बाजूला काइल जेमिसन आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही फार उंच आहात की तुमची उंची योग्य आहे हे सांगणारे एक कटाऊट आहे. या फोटोला त्याने 'जेमिसनच्या धोकादायक गोलंदाजीला निरस्त्र करण्याचा एक उपाय आहे. वानखेडे स्टेडियमवर उंचीच्या आधारे प्रवेश द्या.' असे कॅप्शन दिले.

काइल जेमिसनने कानपूर कसोटीत ३ विकेट घेतल्या. त्याने न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वात वेगाने ५० विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शेन बाँडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. त्याने आतापर्यंत ९ कसोटीत ५२ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी १५.०५ इतकी आहे.

गेल्या दोन वर्षापासून भारतीय फलंदाजांसाठी काइल जेमिसन एक डोकेदुखी ठरला आहे. त्याने घेतलेल्या ५० विकेटपैकी २० विकेट या भारता विरुद्ध घेतल्या आहेत. त्याने विराट कोहलीचीही ( Virat Kohli ) अनेक वेळा शिकार केली आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही विराटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

कानपूर कसोटीत विकेट घेणाऱ्या काइल जेमिसन ( Kyle Jamieson ) आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप १० मध्ये दाखल झाला. तो सध्या टेस्ट रँकिंगमध्ये ९ व्या स्थानावर आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे दोन दिवस खेळपट्टी झाकून ठेवली होती. त्यामुळे वानखेडे कसोटीत देखील काइल जेमिसन आपल्या गोलंदाजीची धार दाखवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT