Marlon Samuels Corruption  esakal
क्रीडा

Marlon Samuels : चुकीला माफी नाही! 2 वर्षे बंदी घातली तरी सॅम्युअल्स काही सुधरला नाही, आता पुन्हा होणार कारवाई

अनिरुद्ध संकपाळ

Marlon Samuels Corruption : वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू मार्लन सॅम्युअल्स चांगलाच अडचणीत आला आहे. त्याला एका स्वतंत्र अँटी करप्शन सुनावणीवेळी अमिराती क्रिकेट बोर्डाच्या अँटी करप्शन नियमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू सॅम्यअल्सला 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या टी 10 लीग स्पर्धेतील 4 प्रकरणात अमिराती क्रिकेट बोर्डाच्या नियमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं. सप्टेंबर 2021 मध्ये आयसीसीने त्याच्यावर आरोप ठेवत त्याला याचे उत्तर देण्यास 14 दिवसांचा वेळ दिला होता.

आता जवळपास 2 वर्षानंतर सॅम्युअल्सला या सर्व प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून त्याला कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. सॅम्युअल्स हा 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.

सॅम्युअल्स कोणत्या कलमाअंतर्गत दोषी?

2.4.2 - खेळाची बदनामी होईल अशा कामासाठी गिफ्ट, पैसे किंवा दुसऱ्या प्रकारे फायदा होईल अशी गोष्ट स्विकारण्याबाबतची माहिती अँटी करप्शन अधिकाऱ्याला न देणे.

2.4.3 - 750 अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त किंमत असलेल्या पार्टीसंदर्भात अँटी करप्शन अधिकाऱ्याला माहिती न देणे.

2.4.6 - अँटी करप्शन अधिकाऱ्याला तपासात सहकार्य न करणे.

2.4.7 - तपासात अशा माहिती देण्यास नकार देणे जी तपासाच्या दृष्टीने महत्वाची आहे.

सामन्याची माहिती केली होती लीक

वेस्ट इंडीजकडून 71 कसोटी 207 वनडे आणि 67 टी 20 सामने खेळलेल्या सॅम्युअल्सने 2000 ते 2018 दरम्यानच्या कारकिर्दीत 11,134 धावा केल्या आहे. तर 152 विकेट्स घेतल्या आहेत. 2008 मध्ये देखील त्याच्यावर 2 वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

त्याने फेब्रुवारी 2007 मध्ये वेस्ट इंडीजच्या मालिकेतील सामन्यासंदर्भातील महत्वाची माहिती लीक केली होती. यानंतर या प्रकरणी त्याला दोषी ठरवून त्याच्यावर 2 वर्षाची बंदी घातली होती.

पोलिसांना एक टेप मिळाली होती. त्यात सॅम्युअल्स हा सट्टेबाजांना सामन्यासंदर्भातील माहिती देत होता. या प्रकरणाचे गांभीर्य पासून आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला तपास करण्यास सांगितले होते.

यानंतर विंडीजने आपल्या खेळाडूवर 2 वर्षाची बंदी घातली होती. 2010 मध्ये त्याने दमदार पुनरागमन करत विंडीजला विजय मिळवून दिला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT