D Gukesh Chess X/FIDE_chess and Instagram/gukesh.official
क्रीडा

D Gukesh Chess: गुकेश 'ते' शब्द खरे करणार? वयाच्या 11व्या वर्षीच केलं होतं मोठं विधान; पाहा Video

D Gukush Video: बुद्धिबळमध्ये इतिहास रचणाऱ्या 17 वर्षीय डी गुकेशने त्याच्या वयाच्या 11 व्या वर्षीच मोठी इच्छा व्यक्त केली होती.

Pranali Kodre

D Gukesh Chess: भारताचा 17 वर्षीय बुद्धिबळपटू डोम्माराजू गुकेशने सोमवारी (22 एप्रिल) पाहाटे इतिहास रचला. त्याने आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament) जिंकली आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी तो पात्र ठरला.

तो आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सध्या बुद्धिबळ विश्वातून आणि भारतभरातून कौतुक होत आहे.

इतकेच नाही, तर तो आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा केवळ दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी 10 वर्षांआधी विश्वनाथन आनंदने ही स्पर्धा जिंकली होती.

खरंतर गुकेशने हे दाखवून दिले आहे की स्वप्न पाहिली, तर ती खरी होऊ शकतात. चेन्नईचा असलेल्या गुकेशने 2017 साली वयाच्या 11 व्या वर्षी एक मुलाखत दिली होती, ज्यात तो म्हणाला होता की त्याला सर्वात युवा वर्ल्ड चेस चॅम्पियन व्हायचे आहे.

आता त्याचे हे स्वप्न सत्यात उतरू शकते. तो वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरला असून त्याचा सामना डिंग लिरेनशी होणार आहे.

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी पाहाटे त्याचा सामना हिकारू नाकामुराशी होता, जो सामना ड्रॉ झाला. तसेच इयान नेपोम्नियाची आणि फॅबिआनो कॅरुआना यांच्यातील सामनाही ड्रॉ झाल्याने गुकेशचा अव्वल क्रमांक निश्चित झाला आणि तोच या स्पर्धेचा विजेताही झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार गुकेशमधील कौशल्य सर्वात आधी ओळखलं ते त्याच्या शाळेतले कोच भास्कर यांनी. तो लहान असतानाच त्यांनी त्याला प्रेरणा दिली आणि त्याला 6 महिन्यातच फिडेच्या क्रमवारीत प्रवेश करून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये अवघे 12 वर्षे 7 महिने आणि 17 दिवस वय असताना गुकेश दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला. तो केवळ 17 दिवसांनी सर्जे कार्जाकिनपेक्षा मागे होता.

गुकेशने 2022 मध्ये 2700 ईएलओ रेटिंग पॉइंट्सचा टप्पा पार केल्यानंतर वर्षभरातच सप्टेंबर 2023 मध्ये त्याने तो 2750 ईएलओ रेटिंग पॉइंट्स मिळवले. हा टप्पा गाठणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला.

यादरम्यान, तो भारताचा अव्वल क्रमवारी असलेला खेळाडूही ठरला. त्यावेळी त्याने त्याने 37 वर्षांपासून विश्वनाथन आनंदचा विक्रम मोडला होता.

तो गेल्यावर्षाच्या अखेरीस आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यावेळीही तो ही स्पर्धा खेळणारा तिसरा सर्वात युवा खेळाडू होता. आता त्याने ही स्पर्धाही जिंकून नवा विक्रम केला असून अनेक युवा खेळाडूंनाही प्रेरणा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT