MS-Dhoni 
क्रीडा

धोनी 'टीम इंडिया'मध्ये आला अन् मला संघात संधी मिळणं बंद झालं!

धोनी 'टीम इंडिया'मध्ये आला अन् मला संघात संधी मिळणं बंद झालं! एका बड्या भारतीय क्रिकेटपटूचं रोखठोक मत When MS Dhoni came in team I knew that door was closed for me in Team India says Dinesh Karthik vjb 91

विराज भागवत

एका बड्या भारतीय क्रिकेटपटूचं रोखठोक मत

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट (Team India) संघाचे अनेक कर्णधार (Captain) होऊन गेले. त्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण? असा प्रश्न विचारला तर प्रत्येक जण वेगवेगळी नावं घेईल. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा सवाल केल्यास मात्र बऱ्याच लोकांच्या तोंडावर सेम नाव असेल, ते म्हणजे महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनीने टी-२० आणि वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, IPLचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद अशी सर्व विजेतेपदं पटकावली. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी वर्षभर क्रिकेटपासून (Cricket) दूरच राहिला आणि नंतर त्याने निवृत्ती (Retirement) जाहीर केली. पण धोनीचे संघात आगमन झाले, त्यावेळेपासून एका खेळाडूला संघात स्थान मिळणं बंद झालं. त्या बड्या क्रिकेटपटूनेच हा खुलासा केला.

"जेव्हा धोनीला संघात स्थान मिळण्यास सुरूवात झाली त्यावेळी त्याने क्रिकेटचा आणि विकेटकिपर या भूमिकेचा चेहराच बदलून टाकला. त्याची स्टाईल आणि त्याची खेळी दोन्ही उत्तम होते. त्यामुळे सारा देश त्याचा चाहता झाला. आणि त्याच वेळी मी समजून गेलो की आता माझ्यासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद झाली आहेत", अशा शब्दात भारताचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक याने आपल्या भावना व्यक्त केल्या. उत्तम फलंदाज आणि उत्तम विकेटकिपर या दोन्ही भूमिका बजावणं ही खूपच कौशल्याची बाब आहे. ही गोष्ट धोनीला छान जमली. सैय्यद किरमाणी आधी भारतासाठी ही भूमिका बजावत होते. त्यानंतर किरण मोरे यांनी लौकिलाला साजेसा खेळ करून दाखवला. त्यानंतर धोनी आहे. धोनी हा असा खेळाडू आहे जो एक पिढीत एकच असतो. त्यामुळे त्याची प्रतिभा पाहून मी समजून गेलो आता मला टीम इंडियामध्ये स्थान मिळणं कठीण आहे.

Dinesh Karthik

दरम्यान, सध्या धोनी विविध कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या धोनीचा एक नवा लूक असलेला फोटो व्हायरल झाला. T20 World Cup 2007 मध्ये धोनीने लांब केसांची स्टाईल करत विश्वचषक उंचावला. तेव्हापासूनच धोनीच्या विविध स्टाईल्स चाहत्यांना आवडू लागल्या. सध्यादेखील धोनीचा एक भारदस्त मिशी असलेला फोटो व्हायरल झाला. एका ठिकाणी धोनी आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेताना दिसला. त्या फोटोत धोनीची वाढलेली दाढी आणि भारदस्त मिशा चांगल्याच उठून दिसल्या. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर धोनीचा नवा लूक लोकांना चांगलाच पसंतीस उतरताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT