Where and When To Watch India Maharajas vs World Giants Independence Day Special Legends League Cricket Live Match esakal
क्रीडा

Legends League Cricket " दादाची महाराजा भिडणार वर्ल्ड जायंट्सशी; वाचा कधी अन् कोठे?

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : लेजंड लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम हा 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दुसऱ्या हंगामाची सुरूवात ही इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यातील विशेष सामन्याने होणार आहे. हा सामना भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सन्मानार्थ खेळवला जाणार आहे. हा सामना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभिनयानाअंतर्गत होणार आहे. (Where and When To Watch India Maharajas vs World Giants Independence Day Special Legends League Cricket Live Match)

इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली करणार असून वर्ल्ड जायंटचे नेतृत्व इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता माजी कर्णधार इऑन मॉर्गन करणार आहे. जवळपास 9 देशातील दिग्गज माजी खेळाडू लेजंड लीग क्रिकेट 2022 च्या हंगामात भाग घेणार आहेत.

India Maharajas vs World Giants खास सामन्याचे ठिकाण, वेळ

लेंजड लीग क्रिकेटमधील इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट यांच्यातील खास सामना 16 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. हा टी 20 सामना रात्री 7 वाजता सुरू होईल. हा सामना लेजंड लीग क्रिकेट सामना हा सोनी स्पोर्ट्सवर प्रक्षेपित होणार आहे. याचबरोबर या सामन्याचे सोनी लीव्ह अॅपवर देखील लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

इंडिया महाराजा संघ :

सौरभ गांगुली (कर्णधार), विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रिनाथ, इरफान पठाण, पार्थिक पटेल, स्टुअर्ट बिनी, एस. श्रीसंत, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंग, जोगिंदर शर्मा

वर्ल्ड जायंट संघ :

इऑन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्ज, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रिओर, नॅथम मॅक्युलम, जाँटी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकादझा, मुश्रफे मुर्तझा, असगर अफगान, मिशेल जॉनसन, ब्रेट ली, केव्हिन ओब्रेन, दिनेश रामदीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT