Akash Madhwal esakal
क्रीडा

MI च्या संघात सुर्यकुमार यादवची जागा घेणारा आकाश मधवाल आहे तरी कोण?

मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यातील सुर्यकुमार यादव जायबंदी झाल्यानंतर आकाश मधवालला संधी दिली.

धनश्री ओतारी

आयपीएल 15 सीझन अखेरच्या टप्प्यावर आहे. अशातच अनेक संघात अनेक बदल घडताना दिसत आहेत. अशातच 5 वेळा चॅम्पियन बनलेली मुंबईची टीम यंदाच्या सीझनमध्ये फ्लॉप ठरली आहे. दरम्यान, या संघाने आपल्या ताफ्यातील सुर्यकुमार यादव जायबंदी झाल्यानंतर आकाश मधवाल (Akash Madhwal) याला संधी दिली आहे. 28 वर्षीय मधवाल हा भारतातील उत्तराखंड राज्याचा आहे.

मधवाल हा भारतातील उत्तराखंड राज्याचा असून या राज्य संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याचा जन्म रुडकी शहरात 25 नोव्हेंबर 1993 मध्ये झाला. तो मध्यमगती गोलंदाज आहे.

त्याने 2019 साली उत्तराखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी त्याने 2019 मध्ये उत्तराखंडकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर त्याने 2021 मध्ये त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मधवाल हा आयपीएल 2022 साठी (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा आधीपासून सदस्य होता. त्याला हंगामाच्या आधी झालेल्या शिबिरासाठीही निवडण्यात आले होते. दरम्यान, त्याने केलेल्या प्रदर्शनाने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी प्रभावित झाली, त्यामुळे त्याला आता मुख्य संघात निवडण्यात आले असल्याचे समोर येत आहे.

मधवालची कामगिरी

मधवालने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 6 प्रथम श्रेणी सामने, 11 अ दर्जाचे सामने आणि 15 टी20 सामने खेळले आहेत आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 विकेट्स घेतल्या असून 32 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी20 मध्ये त्याने आत्तापर्यंत 15 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई प्लेऑफमधून बाहेर

मुंबई इंडियन्स यापूर्वीच आयपीएल 2022 हंगामातील प्लेऑफ फेरीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 12 सामने खेळले असून 3 सामने जिंकले आहेत आणि 9 सामने पराभूत झाले आहेत. आता त्यांना शेवटचे 2 सामने खेळायचे असून गुणतालिकेतील अखेरचे स्थान टाळण्यासाठी त्यांना हे दोन्ही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT