rishabh pant esakal
क्रीडा

'मी केवळ 24 वर्षाचा' ऋषभ पंत असे का म्हणाला?

दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली.

धनश्री ओतारी

दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. दिल्लीने ठेवलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या तगड्या फलंदाजीला 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यानंतर अनेका गोष्टींवर चर्चा करण्यात आली.

स्टार स्पोर्टस कार्यक्रमात बोलताना हरभजन सिंहने पंतला त्याच्या आऊट होण्यासंदर्भात विचारलं. तु षटकार ठोकलास. पण पुढच्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात आऊट झालास. त्यावेळी तु कोणता विचार करत होतास. असा सवास हरभजनने उपस्थित केला.

यावर पंत म्हणाला, मी सर्व मॅचमध्ये 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वस्तात बाद झाल्याने थोडा निराश आहे. मात्र, पुढच्या सामन्यात मी पुर्ण तयारीने उतरणार आहे. असे मत व्यक्त केले. त्याच्या या मोठ्या वक्तव्यानंतर भज्जीने पंतकडे 25 ऐवजी 75 धावा करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर स्पिनर अक्षर पटेलने पंतला 75 धावा करण्याची वेळ आली आहे. असे वक्तव्य केलं. पटेलनंतर मोहम्मद कैफनेदेखील पंतकडे अशीच इच्छा व्यक्त केली. यावर पंतने मी केवळ 24 वर्षाचा आहे. असं वक्तव्य केलं.

दिल्लीकडून फलंदाजी करताना मिशेल मार्शने दमदार खेळी करत 63 धावा केल्या. त्याला सर्फराज खानने आक्रमक 32 धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून लिव्हिंगस्टो अर्शदीपने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

दिल्लीच्या आजच्या विजयामुळे आरसीबीचे टेन्शन वाढले आहे. कारण दोन्ही संघ आता 14 गुणांवर आहेत. दोन्ही संघांचे एक एक सामने जिंकले आहेत. दिल्लीचे रनरेट चांगले आहे. त्यामुळे आरसीबी पुढचा सामना हरली आणि दिल्ली जिंकली तर प्ले ऑफमध्ये जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT