Virat Kohli esakal
क्रीडा

IND vs NZ : विराट कोहलीने न्यूझीलंडला का दिला नाही फॉलोऑन?

विराट कोहलीने फॉलोऑन न देण्यामागे आहे लॉजिकल कारण

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावात संपवला. टीम इंडियाच्या दोन तासातच एजाज पटेलच्या १० विकेट्स घेण्याच्या विश्वविक्रमाची झळाली कमी केली. टीम इंडियाने न्यूझीलंडला ६२ धावात गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) न्यूझीलंडला फॉलोऑन देईल अशी अपेक्षा सर्व क्रिकेट चाहत्यांना होती मात्र विराटने न्यूझीलंडला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

भारतीय गोलंदाजांनी अवघी २८ षटके टाकली होती त्यामुळे भारतीय गोलंदाज दमले होते असे म्हणता येणार नाही. तरीही विराट कोहलीने ( Virat Kohli ) फॉलोऑन दिला नाही. यामागे विराट कोहलीचे एक लॉजिक दिसून येते. वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी ही सामन्यापूर्वी दोन दिवस झाकून ठेवली होती. म्हणजे त्या विकेटवर दोन दिवस रोलिंग झालेले नव्हते. याचा फायदा पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी उचलला. एकट्या एजाज पटेलने भारताचे चार फलंदाज तंबूत धाडले. पटेलने आपला हा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत उरलेले सहा भारतीय फलंदाजांचीही शिकार केली. ( IND vs NZ 2nd test )

विशेष म्हणजे पहिला दिवस हा फक्त दोन सत्रांचाच होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २ तासाच्या आतच गुंडाळला. तंस पहायला गेलं तर फक्त दुसऱ्याच दिवशी तब्बल १६ विकेट पडल्या. याचा अर्थ वानखेडेवरील खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवत आहेत. अशा परिस्थितीत जर न्यूझीलंडला ( New Zealand ) विराट कोहलीने फॉलोऑन दिला असता आणि चुकून न्यूझीलंडने २६३ धावा पार करुन भारतासमोर शंभर दिडशेचे टार्गेट दिले असेत तर वानखेडेच्या या खेळपट्टीवर चौथ्या पाचव्या दिवशी फिरकीचा सामना करत शंभर दीडशे धावा करणे जिकीरीचे गेले असते.

आता न्यूझीलंडने ( New Zealand ) दुसऱ्या डावात २६३ धावा पार करुन भारताला ( India ) टार्गेट दिले असते का? तर याचे उत्तर आहे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. लॉजिकली कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या दिवशी सर्वसाधारणपणे खेळपट्टी फलंदाजांना थोडी साथ देत असते. या सर्व परिस्थितीचा विचार करता विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन न देण्याचा निर्णय अनाकलनीय नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhar Card : 'यासाठी' आधार कार्ड बाद, लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा! राज्य सरकारचा नवा GR काय?

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT