Shubman Gill WI vs IND  esakal
क्रीडा

Shubman Gill WI vs IND : गिल भारताचा पुढचा कर्णधार... गॅरी सोबर्स यांच्याशी बोलताना द्रविड काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill WI vs IND : भारताचा कसोटी संघ नुकताच दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीज येथे दाखल झाला. पहिल्या दिवशी बीच व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेल्यानंतर आता टीम इंडियाने आपल्या सरावाला सुरूवात केली आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी खेळाडू सर गॅरी सोबर्स यांची टीम इंडियाच्या खेळाडूंनी भेट घेतली.

यावेळी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या युवा खेळाडूंची ओळख सोबर्स यांना करून दिली. यात शुभमन गिलचा देखील समावेश होता. राहुलने त्याची खास पद्धतीने ओळख करून दिली.

वेस्ट इंडीजचे महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स आज भारतीय संघाची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड सोबतच कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली त्यांना भेटण्यासाठी पोहचले होते. याचबरोबर राहुल द्रविडने इतर खेळाडूंची देखील त्यांच्याशी भेट घडवून दिली.

राहुल द्रविडने सोबर्स यांच्याशी शुभमन गिलची भेट घालून देताना खास ओळख करून दिली. द्रविड म्हणाला की, हा आमचा सर्वात युवा आणि गुणवान खेळाडूंपैकी एक आहे. यानंतर सोबर्स यांनी मी तुमच्याबद्दल बरेच ऐकले आहे. असे उत्तर दिले.

शुभमन गिल भविष्यातील कर्णधार

शुभमन गिलने तीनही क्रिकेट फॉरमॅटमधील भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून देखील पाहिले जात आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर रोहित शर्मा कसोटीचा कर्णधार असेलच याची काही शाश्वती नाही. वनडे वर्ल्डकपनंतर रोहित कर्णधारपद सोडू शकतो.

अशा परिस्थितीत शुभमन गिल हा नव्या दमाचा कर्णधार म्हणून पुढे येऊ शकोत. राहुल द्रविडने ज्या प्रकारे शुभमन गिलची गॅरी सोबर्स यांच्याशी ओळख करून दिली ते पाहता गिलचे संघातील महत्व किती वाढलं आहे हे लक्षात येते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT