rohit sharma press conference SAKAL
क्रीडा

Wi vs Ind: पहिल्या कसोटी जिंकल्यानंतरही टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये होणार बदल! कर्णधारने दिले संकेत

Kiran Mahanavar

India vs West Indies 1st Test : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात 150 धावा करणारा कॅरेबियन संघ दुसऱ्या डावात 50 षटकात 130 धावांत गारद झाला. त्याचवेळी टीम इंडियाने पहिला डाव 5 विकेटच्या मोबदल्यात 421 धावांवर घोषित केला आणि 271 धावांची आघाडी घेतली. या दणदणीत विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुढच्या सामन्याच्या प्लेइंग 11 बद्दल मोठे विधान केले आहे.

पहिल्या सामन्यातील जिंकल्यानंतर रोहित शर्माने क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. उभय संघांमधील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 20 जुलैपासून खेळवला जाणार आहे.

रोहित म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली सुरुवात करणे. आम्हाला खेळपट्टीची फारशी चिंता नव्हती, आम्हाला इथे येऊन निकाल मिळवायचा होता. आता आम्ही ही गती दुसऱ्या कसोटीत घेऊ इच्छितो. असे काही खेळाडू आहेत जे जास्त कसोटी खेळलेले नाहीत, त्यामुळे आता त्यांना मैदानात उतरवायचे आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात श्रीकर भरत, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने पुढच्या सामन्याच्या प्लेइंग 11 बद्दल करून एखाद्या खेळाडूला संधी देऊ शकतो.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, 'रिजलट्स स्वतःच बोलतात, ते काही काळापासून हे करत आहेत. त्यांना सांगण्यासारखे फार काही नाही, अशा खेळपट्ट्यांचा अनुभव घेणे त्याच्यासाठी लक्झरी आहे. अश्विन आणि जडेजा दोघेही उत्कृष्ट होते, विशेषतः अश्विनची गोलंदाजी उत्कृष्ट होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT