Mohammed Siraj rested for ODIs against West Indies 
क्रीडा

WI vs IND ODI: पहिल्या वनडेच्या काही तास आधीच भारताला धक्का! सिराज 'या' कारणामुळे मालिकेतून बाहेर

सकाळ ऑनलाईन टीम

Mohammed Siraj rested for ODIs against West Indies : भारतीय संघ आज वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वनडे सामना खेळणार आहे, मात्र आता वनडे सामन्याच्या काही तास आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अचानक भारतात परतला आहे आणि तो या एकदिवसीय मालिकेत भाग खेळणार नाही. याचे कारण समोर आले आहे.

हा खेळाडू परतला भारतात!

मीडिया रिपोर्टनुसार, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी दुसऱ्या कसोटीनंतर भारतात परतले आहेत, कारण हे खेळाडू एकदिवसीय मालिकेत सहभागी नव्हते. या खेळाडूंसोबत मोहम्मद सिराजही भारतात आला आहे.

बीसीसीआयने त्याचा वर्कलोड लक्षात घेऊन एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली आहे. मात्र अद्याप बीसीसीआयने त्याच्या कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच बदलीची घोषणाही केली नाही.

मोहम्मद सिराज उत्कृष्ट फॉर्ममध्ये

मोहम्मद सिराज गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने टीम इंडियासाठी एकट्याने अनेक सामने जिंकले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी गोलंदाजी आक्रमणातील तो महत्त्वाचा दुवा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एकूण 7 बळी घेतले.

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही तो खेळला होता. याशिवाय आरसीबीकडून खेळताना त्याने 14 सामन्यात 19 विकेट घेतल्या. आता सिराज भारताकडून आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघाला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आशिया कपमध्ये सहभागी व्हायचे आहे. यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. मग 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 मध्ये भाग घ्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Aggressive:'ग्रामस्थ-वनअधिकाऱ्यांत रणकंदन'; नगर तालुक्यातील महिला आक्रमक, पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी पुन्हा रंगभूमीकडे, लेक आशीचं ‘लैलाज’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

अर्जुन कपूरला त्याच्या चाहत्यांनीच केलं ट्रोल!

Supreme Court: आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही; ‘स्थानिक’बाबत न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT