West Indies announce squad for India ODI series 
क्रीडा

WI vs IND: ODI मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा! दोन दिग्गज खेळाडूचा पत्ता कट, यांना मिळाली संधी

सकाळ ऑनलाईन टीम

West Indies announce squad for India ODI series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली, मात्र टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 27 जुलै रोजी होणार आहे.

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे. एकदिवसीय मालिकेत चांगल्या कामगिरीवर रोहित सेनेची नजर असेल. एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आता वेस्ट इंडिजने एकदिवसीय मालिकेसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. (India vs West Indies ODI Series)

या खेळाडूंचे पुनरागमन

क्रिकेट वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी वेस्ट इंडिजने खेळाडूंसाठी एक शिबिर आयोजित केले होते, त्यापैकी 15 खेळाडूंची वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी सर्वोत्तम फलंदाज शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांना माघारी बोलावले आहे तर पूरण आणि होल्डर यांचा पत्ता कट झाला आहे.

त्याचवेळी दुखापतीतून बरे होऊन संघात पुनरागमन करणारे तीन खेळाडू आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज जेडेन सील्स, लेगस्पिनर यानिक कारिया आणि फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ:

शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उप-कर्णधार), अॅलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :

पहिली वनडे - 27 जुलै; केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस

दुसरी वनडे - 29 जुलै; केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस

तिसरा एकदिवसीय - 15 ऑगस्ट; ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

Ranveer Singh: सारा अर्जुनचा पहिला मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट; रणवीरने सिंग केली तोंडभरून प्रशंसा

Acharya Devvrat : नैसर्गिक शेतीत नवनवे शोध लावणारे शेतकरी 'शास्त्रज्ञच'! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार

Kalyan Politics कल्याण भाजपाच्या रडारवर ! 'डोंबिवली नंतर कल्याणात सर्जिकल स्ट्राईक'; शिंदे सेना-ठाकरे गटात खळबळ

SCROLL FOR NEXT