rohit sharma sakal
क्रीडा

Ind vs WI: कर्णधार रोहित चौथा T-20 सामना खेळणार का नाही? BCCI ने स्पष्ट

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाने 2-1 आघाडी घेतली आहे.

Kiran Mahanavar

India vs West Indies 4th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाने 2-1 आघाडी घेतली आहे. भारताने तिसरा सामना 7 गडी राखून जिंकून ही आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पाठीच्या दुखापतीमुळे 5 चेंडूत केवळ 11 धावा करून निवृत्त झाला. पण आता बीसीसीआयने रोहितच्या फिटनेसबाबत अपडेट देत चाहत्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हिटमॅनच्या सराव सत्राचे काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा फलंदाजी करताना दिसत आहे, तर ऋषभ पंत त्याला नेटबाहेर उभा पाहत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले होते की, कर्णधार रोहित शर्माला पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. आता तो बरा झाला असून पुढील दोन सामन्यांसाठी तो तंदुरुस्त असल्याचे कळत आहे. तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला फलंदाजी करताना दुखापत झाली होती. तो 11 धावांवर असताना त्याच्या पाठीचा स्नायू दुखावला. त्याला मैदान देखील सोडावे लागले.

या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार असून भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ व्हिसाच्या समस्येनंतर तेथे पोहोचले आहेत. चौथा T20 आज म्हणजेच 6 ऑगस्टला खेळवला जाईल, तर शेवटचा सामना 7 ऑगस्टला खेळवला जाईल.

भारतीय संघ :

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT