WI vs IND Series Hardik Pandya 
क्रीडा

WI vs IND T20: लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पांड्या संतापला! 'या' खेळाडूंवर फोडले खापर

Kiran Mahanavar

WI vs IND Series Hardik Pandya : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 9 विकेट गमावून केवळ 145 धावा करता आल्या. यासह विंडीजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या टी-20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजकडून 4 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या संतापला आणि पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, जेव्हा तुम्ही टी-20 सामन्यात सतत विकेट गमावता तेव्हा असे दडपण असते. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही खूप आरामात दिसत होतो, पण सामन्यात आम्ही काही मोठ्या चुका केल्या, ज्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. टी-20 क्रिकेटमध्ये जेव्हाही तुम्ही तुमच्या डावात सतत विकेट गमावता तेव्हा कोणतेही लक्ष्य गाठणे खूप कठीण असते आणि आज आमच्यासोबत तेच घडले आहे. दोन मोठे फटके टी-20 क्रिकेटमधील संपूर्ण खेळ बदलू शकतात. डावाच्या मध्यभागी आम्ही 2 विकेट गमावल्या असताना आमची लय बिघडली आणि धावांचा पाठलाग पूर्ण होऊ शकला नाही.

कर्णधार हार्दिक पांड्याने पहिल्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटूंना संधी दिली. अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या तिघांनाही पहिल्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली होती. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या निर्णयाचा बचाव करताना सांगितले की, 'तीन फिरकीपटूंना घेण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात आला होता. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंना येत्या सामन्यांमध्ये एकत्र खेळण्याची संधी देऊ इच्छितो. अक्षर पटेल आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये चांगले संतुलन देतो.

कर्णधार हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, 'तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. मुकेश कुमारने शेवटची दोन चांगली षटके टाकली, ही चांगली गोष्ट आहे. मुकेश कुमारने वेस्ट इंडिजमध्ये दोन आठवडे घालवले आहेत आणि त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. त्याला संघासाठी योगदान द्यायचे आहे. टिळक वर्मा यांनी ज्या पद्धतीने डावाची सुरुवात केली ते पाहून खूप आनंद झाला. टिळक वर्मा यांच्याकडे आत्मविश्वास आणि निर्भयता आहे. तो भारतासाठी चमत्कार घडवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT