tilak varma sakal
क्रीडा

Wi vs Ind: तिलक वर्माचे अर्धशतक एका धावेने हुकले अन् रचला अनोखा विक्रम! गंभीर-कोहलीची क्लबमध्ये एन्ट्री

Kiran Mahanavar

Wi vs Ind T20 Tilak Varma : युवा फलंदाज तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच वर्चस्व गाजवले आहे. विंडीजविरुद्ध त्याची बॅट सातत्याने बोलत आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 39 आणि दुसऱ्या टी-20 मध्ये 51 धावा केल्या. त्याचवेळी तिलकने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही शानदार फलंदाजी केली.

गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर त्याने 37 चेंडूंचा सामना केल्यानंतर नाबाद 49 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार मारला. तिळकचे फक्त एका धावेने अर्धशतक हुकले असतील पण त्यांनी गौतम गंभीर आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

तिळक वर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 49 धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारताचा माजी सलामीवीर गंभीरने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात नाबाद 49 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, माजी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर कोहली 49 च्या वैयक्तिक स्कोअरवर नाबाद परतला.

याशिवाय एका विशिष्ट बाबतीत तिळकने सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे. पहिल्या तीन टी20 आंतरराष्ट्रीय डावात 30 पेक्षा जास्त धावा करणारा तो सूर्यकुमार नंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमावून 159 धावा केल्या. या मालिकेतील ही सर्वात मोठी धावसंख्या होती. मात्र, भारताने अवघ्या 17.5 षटकांत तीन गडी गमावून 164 धावा केल्या आणि सामना सहज जिंकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 83 आणि तिलक वर्माने 49 धावा केल्या, तर कुलदीप यादवने तीन बळी घेतले. त्याचवेळी वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने 42 आणि पॉवेलने 40 धावा केल्या. अल्झारी जोसेफने दोन गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का, मुरगुडमध्ये सत्ता समीकरण बदलले

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

SCROLL FOR NEXT