ashish nehra become head coach of indian cricket team after rahul dravid 
क्रीडा

Team India Head Coach : राहुल द्रविडनंतर आशिष नेहरा होणार टीम इंडियाचा कोच?

Kiran Mahanavar

Team India Head Coach : भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सध्या चर्चत आला आहे. नेहरा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो, असे बोलले जात आहे. सध्या हा माजी गोलंदाज आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पदार्पणाच्या मोसमातच नेहराच्या प्रशिक्षणाखाली विजेतेपद पटकावले. यानंतर पुढच्या हंगामात म्हणजेच 2023 मध्येही आयपीएल फ्रँचायझी अंतिम फेरीत पोहोचली.

दुसरीकडे, भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार नोव्हेंबरमध्ये संपणार असून, त्यांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही. त्यामुळे नेहरा प्रशिक्षक बनल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण 'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नेहराला भारताचा कोच बनण्यात रस नाही कारण माजी गोलंदाजाचा गुजरात टायटन्ससोबत 2025 अखेरपर्यंत करार आहे.

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी जर भारताने वर्ल्डकप जिंकला, तर द्रविडला त्याचा कार्यकाळ वाढवायचा नाही. कारण त्याला त्याचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने संपवायचा आहे. पण तुम्ही मला विचाराल तर वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करायला हवा. त्याने राहुल द्रविडला रेड बॉलचे प्रशिक्षक म्हणून काम सुरू ठेवण्यास सांगितले पाहिजे.

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2021 टी-20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर रवी शास्त्रीचा करार संपला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. आता राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहतो की त्याच्या जागी दुसरे कोणी येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT