Will Mumbai Indians include Arjun Tendulkar against Sunrisers Hyderabad?
Will Mumbai Indians include Arjun Tendulkar against Sunrisers Hyderabad? esakal
क्रीडा

सचिनच्या अर्जुनमुळं Mumbai Indians होतीय ट्रोल, काय आहे कारण?

धनश्री ओतारी

आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यंदाच्या सीझनमध्ये पुर्णपणे फ्लॉप ठरलेला संघ आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. आजच्या लढतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण होऊ शकते. असे संकेत मुंबई इंडियन्सने दिले आहेत. मात्र, सोशल मीडियावर हा संघ ट्रोल होताना दिसत आहे.

आयपीएल 15 वा सीझन महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून मास्टर ब्लास्टरचा मुलगा मुंबईकडून खेळण्याची वाट पाहत आहे. मुंबईने आत्तापर्यंत 12 मॅच खेळले आहेत. मात्र, एकाही सामन्यात अर्जुनला संधी दिलेली नाही. त्यामुळे चाहतेदेखील तो खेळण्यात आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबई इंडियन्सने अखेरच्या तरी सामन्यात अर्जुनला संधी द्यावी असे म्हटले आहे.

मुंबईने सोमवारी अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे. आणि त्याला गोंधळात टाकणारी कॅप्शन दिली आहे. स्लो की एक वेगवान यॉर्कर. असा सवाल करत अर्जुन डबल माइंड फसला आहे. असे मुंबईने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. मुंबईची ही पोस्ट अर्जूनची बहिण साराने आपल्या इंस्ट स्टोरीवर शेअर केली आहे.

पण त्याचा फोटो पाहून नेटकरी त्याला कधी खेळवणार, असा सवाल करत एक तरी सामना खेळवा अशी मागणी करताना दिसत आहेत.

गेले काही दिवस झाले मुंबई केवळ अर्जुनचा फोटो सोशल अकाऊंट्स वर पोस्ट करताना दिसत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात खेळवतील असं वाटले होते. पण तसे काही घडलेच नाही. असे दोनवेळा झाले त्याचा फोटो पोस्ट केला आणि त्याला खेळवलं नाही. त्यामुळे क्रिकेट जगतातून त्याला एकतरी मॅच खेळवा अशी मागणी करण्यात येत आहे.

मुंबई एकीकडे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहेत तर, हैदराबादला अंतिम ४ मध्ये पोहोचण्याचे आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. जर संघ आज हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून औपचारिकपणे बाहेर होईल. दुसरीकडे, मुंबईचा संघ हैदराबादचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT