Rohit Sharma World Cup 2023 Esakal
क्रीडा

Rohit Sharma : फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा सोडणार कर्णधारपद? माजी चीफ सिलेक्टर स्पष्टच बोला

रोहित शर्मा : फायनलमधील पराभवानंतर कर्णधारपदावर संशय? माजी चीफ सिलेक्टरची मत येते

Kiran Mahanavar

Rohit Sharma World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट शतक झळकावले. त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाने एकूण सहावे वर्ल्ड कप जिंकले आहेत. इंडिया टीव्हीशी बोलताना भारताचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी रोहितच्या कर्णधारपदावर मोठी गोष्ट सांगितली आहे.

फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडू शकतो का? यावर प्रतिक्रिया देताना भारताचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाला की, रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केले आहे. त्यामुळे एक सामना त्याला महान किंवा वाईट खेळाडू बनवत नाही.

पुढे तो म्हणाला की, मी एका सामन्यातून कोणतेही मूल्यांकन करणार नाही. फायनलमध्ये कमी धावा झाल्या. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पण शेवटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

असा आहे रोहितचा कर्णधारपदाचा विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेत एकूण 11 सामने खेळले, ज्यापैकी संघाने 10 जिंकले. एकदिवसीय वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक सामने जिंकणारा तो कर्णधार बनला आहे.

याआधी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला हरवून आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 45 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 35 जिंकले आहेत.

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. सुरुवातीला भारतीय संघाने 10 षटकांत 80 धावा केल्या होत्या, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांवर दडपण आले आणि त्यामुळे त्यांना मोठा डाव खेळता आला नाही.

भारताकडून रोहितने 47, विराट कोहलीने 54 आणि केएल राहुलने 66 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चांगली भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT