Wimbledon 2022 Women’s Final sakal
क्रीडा

विम्बल्डनची नवी चॅम्पियन, जेबुरला हरवून रिबिकानानं जिंकलं ग्रँडस्लॅम

पेट्रा क्विटोवानंतर रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू बनली आहे.

Kiran Mahanavar

Wimbledon 2022 Women’s Final : विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज कझाकिस्तानची एलेना रिबाकिना आणि ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर यांच्यात महिला एकेरीची लढत झाली. विम्बल्डनला एलेना रिबाकिनाच्या रुपात नवीन विजेती मिळाली आहे. पेट्रा क्विटोवानंतर रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू बनली आहे. तिने ओन्स जेबुरचा 3-6, 6-2, 6-2 असा पराभव करून विम्बल्डनचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे.(Elena Rybakina battles back against Ons Jabeur to win Wimbledon title)

एक तास ४७ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात रायबाकिनाने पहिला सेट गमावला होता, परंतु तिचा एकूणच खेळ पहाता विजेतेपदासाठी तिलाच पसंती दिली जात होती. वास्तवित तिला १७ वे; तर जेबेरला तिसरे मानांकन होते, परंतु सहज सुंदर खेळात रायबाकिना सरस ठरली.

कझाकिस्तानच्या या २३ वर्षीय खेळाडूने गतवर्षी चौथ्या फेरीपर्यंत प्रगती केली होती. यंदा थेट विजेतेपदास गवसणी घातली. जेबेर ही ट्युनिशियाची खेळाडू गतवर्षी विम्बल्डनमध्ये तीसुद्धा चौथ्या फेरीत खेळली होती. रायबाकिनापेक्षा विम्बल्डन खेळण्याचा अनुभव तिच्याकडे अधिक होता, २०१७ पासून ती विम्बल्डनमध्ये खेळत आहे.

रायबाकिनाने पहिला सेट गमावला. यादरम्यान तिने दोन सर्व्हिस गमावल्या होत्या, पण दुसऱ्या सेटपासून वेगळ्याच आत्मविश्वाने ती कोर्टवर आली. दुसऱ्या सेटच्या पहिल्या गेमध्ये जेबेरची सर्व्हिस ब्रेक केली आणि तेथून तिने मागे वळून पाहिले नाही. नेटजवळ तसेच बेसलाईनवरून तिने मारलेले अचुक फटके लाजवाब होते.

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्येही सुरुवातीलाच रायबाकिनाने सर्व्हिस ब्रेक मिळवला आणि सामन्याची सूत्रे आपल्याकडेच कायम ठेवली. सहाव्या गेममध्ये मात्र तिला कष्ट करावे लागले. ०-४० वरून सलग सहा गुण जिंकत गेम जिंकला आणि सर्व्हिस कायम राखली. रायबाकिनाचा हा आक्रमक खेळ जेबेरचा आत्मविश्वास अधिकच कमजोर करणारा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT