Wimbledon had to issue a warning after coach had pocketed 27 probiotic yoghurt  esakal
क्रीडा

Wimbledon | कोचने फस्त केले 27 योगर्ट; विम्बल्डनने सर्व खेळाडूंनाच दिला इशारा

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : विम्बल्डन (Wimbledon) ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळाडूंना दिवसाला जेवण भत्ता म्हणून 90 युरो मिळतात. तर त्यांच्या प्रशिक्षकांना त्याच्या निम्मा युरो जेवण भत्ता (Food Allowances) म्हणून मिळतात. मात्र हा भत्ता खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी कसा खर्च करावा याचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही. मात्र यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत ऑल इंग्लंड क्लबला एक विचित्र अनुभव आला. एका प्रशिक्षकाने दिवसाचा संपूर्ण जेवण भत्ता हा 27 योगर्टवर (Yoghurt) खर्च केला.

यानंतर विम्बल्डनने सर्व खेळाडूंना एक ईमेल पाठवून मिळालेल्या जेवण भत्त्याचा जरा नीट वापर करा. या भत्त्याचा गरज नसताना वापर करू नका असा इशारा दिला. द सनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार 'प्रत्येक दिवशी खेळाडू आणि प्रशिक्षकांना भत्ता दिला जातो. या भत्त्याचा सर्वजण पूरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात.'

खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षक स्टाफला (Coaching Staff) हा जेवण भत्ता वापरता यावा यासाठी विम्बल्डनने सहा वेगवेगळे आऊटलेट सुरू केले आहेत. यात दोन कॉफी शॉप, दोन सँडविच स्टॉल आणि दोन रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी मद्याची सोय करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ऑल इंग्लंड क्लबने आयरिश मिरर या वृत्तसंस्थेला सांगितले की, हे सर्व मेल खेळाडूंना पैशाचा काटकसरीने वापर करण्यास सांगण्यासाठी पाठवण्यात आलेले नाहीत.

सध्या युकेमध्ये मोठ्याप्रमाणावर भाववाढ झाली आहे. विशेष म्हणजे ग्रँड स्लॅममध्ये अशा प्रकारे खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या खाण्या - पिण्यावरून अडचण पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ज्यावेळी मोफत खाणं देण्याचा मोठ्याप्रमाणावर गैरफायदा घेतला जाऊ लागला त्यावेळी ही सुविधा बंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

Ashes Series : २६२ धावा, २० विकेट्स! AUS vs ENG चौथ्या कसोटीत गोलंदाजांची हवा, स्टीव्ह स्मिथचा 'झापूक झूपूक' चेंडूवर दांडा गुल Video

College Student Accident: जिवलग मैत्रिणी रोजचा गाडीवरचा प्रवास, पण आजचा दिवस असा येईल वाटलं नव्हतं... भीषण अपघातात दोघींनाही मृत्यूने गाठले

Thane Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना! ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत सौदा अन्...; बालतस्करीचे भयंकर वास्तव समोर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मागील ३ दिवसांपासून भाजपकडून युतीची चर्चा नाही

SCROLL FOR NEXT