wimbledon open 2024 Rybakina Krejcikova djokovic into semi finals Sakal
क्रीडा

Wimbledon 2024 : रायबकीना, क्रेझीकोव्हा उपांत्य फेरीत; जोकोविचची न खेळताच आगेकूच

चौथी मानांकित एलेना रायबकीना व ३१वी मानांकित बार्बोरा क्रेझीकोव्हा यांनी विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

लंडन ­­: चौथी मानांकित एलेना रायबकीना व ३१वी मानांकित बार्बोरा क्रेझीकोव्हा यांनी विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कझाकस्तानच्या रायबकीना हिने एलिना स्वितोलिना हिचे आव्हान परतवून लावले, तर झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा हिने येलेना ओस्तापेंको हिच्यावर मात केली.

एलेना रायबकीना हिने एलिना स्वितोलिना हिच्यावर ६-३, ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये विजय साकारला. तिने एक तास व एक मिनिटात प्रतिस्पर्ध्यावर मात केली. रायबकीना हिने सात बिनतोड सर्व्हिस केल्या. स्वितोलिना हिला एकच बिनतोड सर्व्हिस करता आली. रायबकीना हिच्याकडून एकच दुहेरी चूक घडली. स्वितोलिना हिच्याकडून चार दुहेरी चुका झाल्या.

बार्बोरा क्रेझीकोव्हा हिने येलेना ओस्तापेंको हिचे कडवे आव्हान ६-४, ७-६ असे मोडून काढले. क्रेझीकोव्हा हिने एक तास व ४० मिनिटांत विजय साकारला. दोन्ही सेटमध्ये या लढतीत कडवा संघर्ष पाहायला मिळाला. क्रेझीकोव्हा हिने मात्र दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि दोन्ही सेटमध्ये यश मिळवले.

माजी ग्रँडस्लॅम विजेत्या

एलेना रायबकीना व बार्बोरा क्रेझीकोव्हा या दोन्ही महिला टेनिसपटूंनी विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघींनी याआधी ग्रँडस्लॅम विजेता होण्याचा मान संपादन केला आहे. रायबकीना हिने २०२२मध्ये विम्बल्डन ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले होते. तसेच, बार्बोरा हिने २०२१मध्ये फ्रेंच ओपनच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली हे विशेष. आता या दोन्ही खेळाडू दुसऱ्या ग्रँडस्लम जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील.

फेडररच्या विक्रमाची बरोबरी

नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी टेनिसकोर्टवर न उतरताच उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्यपूर्व फेरीतील त्याचा प्रतिस्पर्धी ॲलेक्स दी मिनॉर याने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला पुढल्या फेरीत स्थान मिळाले.

जोकोविच याने १३व्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. याचसोबत रॉजर फेडररच्या विक्रमाचीही त्याने बरोबरी केली. फेडरर याने सर्वाधिक १३वेळा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती. टेलर फ्रिट्‌झ व लोरेंझो मुसेटी यांच्यामधील विजेत्याविरुद्ध जोकोविचला उपांत्य लढत खेळावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT