women Hockey junior asia cup 2023 hockey india vs malaysia result scores 2 1 sakal
क्रीडा

Hockey Junior Asia Cup : पिछाडीनंतर भारतीय महिलांचा विजय; मलेशियावर २-१ अशी मात

ज्युनियर हॉकी आशियाई करंडक ; सलग दुसरा विजय

सकाळ वृत्तसेवा

काकामिगाहारा (जपान) : सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा २२-० असा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने सोमवारी येथे झालेल्या लढतीत मलेशियावर २-१ असा विजय मिळवला.

भारतीय संघाचा ज्युनियर आशियाई करंडकातील हा सलग दुसरा विजय ठरला. १-० पिछाडीवर असतानाही भारतीय महिला संघाने मलेशियाला २-१ असे नमवले. मुमताज खान व दीपिका यांचे दमदार गोल वैशिष्ट्य ठरले.

मलेशिया व भारत यांच्यामधील लढतीच्या सुरुवातीलाच दोन्ही संघांमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. मलेशियन हॉकीपटू चेंडूचा ताबा आपल्याकडे अधिक ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. भारतीय खेळाडूंनी आक्रमण केले. त्यामुळे भारतीयांना पेनल्टी कॉर्नरही मिळाले, पण त्यांना याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.

डियान नझेरी हिने सहाव्या मिनिटाला मलेशियासाठी गोल केला. हा फिल्ड गोल होता; मात्र मलेशियाला हा आनंद जास्त काळ साजरा करता आला नाही. मुमताज खान हिने दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारतासाठी बरोबरी साधली. पहिल्या क्वॉटरमध्ये दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी होती.

दुसरा क्वॉटरमध्ये भारताने दुसरा गोल केला. दीपिका हिने २६ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वॉटरमध्ये भारतीयांना आक्रमक खेळ केला. चेंडूचा ताबा आपल्याकडे ठेवून मलेशियाचा बचाव भेदण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण या क्वॉटरमध्ये भारत व मलेशिया या दोन्ही देशांना गोल करता आला नाही. चौथ्या क्वॉटरमध्ये मलेशियाने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले, पण भारतीयांनी सातत्याने आक्रमण केल्यामुळे मलेशियाला या क्वॉटरमध्ये बचावावरच जास्त लक्ष द्यावे लागले.

आता लढत कोरियाशी

दक्षिण कोरियाचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघासमोर उद्या (ता. ६) दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक

Ranjani Cable Theft Case: रांजणीच्या खडकवाडीत केबलचोरीचा कहर; ५५ शेतकऱ्यांचे सहा लाखांचे नुकसान, पोलिस तपासाची मागणी तीव्र

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT