Women's IPL  sakal
क्रीडा

Women IPL: महिला IPL विजेता संघ होणार मालामाल! एका संघात पाच परदेशी खेळाडू अन्...

Kiran Mahanavar

Women IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मार्चमध्ये महिला आयपीएल सुरू करणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे मीडिया हक्क विकले गेले आहेत. Viacom18 ने 951 कोटी रुपयांना पाच वर्षांसाठी प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. आता या स्पर्धेची ताजी माहिती समोर येत आहे की ही स्पर्धा 4 मार्चला सुरू होऊ शकते आणि त्याच महिन्याच्या 26 तारखेला अंतिम सामना खेळल्या जाऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलांचे आयपीएल सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होऊ शकतात. पहिल्या सत्रात एकूण 22 सामने खेळल्या जाणार आहेत. पुरुषांच्या आयपीएलसाठी मुंबईचे वानखेडे स्टेडियम सज्ज ठेवण्यात येणार आहे. पुरुषांची आयपीएल 31 मार्च किंवा 1 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

बक्षिसाची रक्कम किती ?

महिला आयपीएलमधील खेळाडूंची बक्षीस रक्कम 10 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला 12 कोटी रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर उपविजेत्याला तीन कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 1 कोटींवर समाधान मानावे लागू शकते.

प्लेइंग इलेव्हनमध्ये किती परदेशी राहतील?

पुरुषांच्या आयपीएल दरम्यान एका संघाच्या प्लेइंग-11 मध्ये जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडू असतात. महिलांच्या आयपीएलमध्ये हा नियम मोडला जाऊ शकतो. प्लेइंग-11 मध्ये पाच परदेशी खेळाडूंना परवानगी दिली जाईल, परंतु त्यापैकी एक सहयोगी देशाचा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT