Women's Asia Cup 2022 India Women's Cricket Team Defeat Malaysia Women Team DLS method esakal
क्रीडा

Women's Asia Cup T20 : भारताचा 181 धावा करूनही मलेशियाविरूद्ध 30 धावांनी विजय

अनिरुद्ध संकपाळ

India Women vs Malaysia Women : आशिया कप महिला क्रिकेट 2022 मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला. भारताने मलेशियासमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मलेशियाने 5.2 षटकात 2 बाद 16 धावा केल्या असतानाच पावसाने सुरूवात केली. त्यानंतर सामन्यात एकाही षटकाचा खेळ झाला नाही. मलेशियाच्या डावाची पाच षटके पूर्ण झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारताकडून मेघनाने सर्वाधिक 69 धावांची तर शेफाली वर्माने 46 तर रिचा घोषने नाबाद 33 धावांची खेळी करत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले होते.

भारताने ठेवलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मलेशियाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात विनिफ्रेड भोपळाही न फोडता दिप्ती शर्माची शिकार झाली. त्यानंतर वान जुलियाला राजेश्वरी गायकवाडने 1 धावेवर बाद करत मलेशियाची अवस्था 2 बाद 6 धावा अशी केली होती.

मात्र त्यानंतर मास एलिसाने 17 चेंडूत नाबाद 14 धावा करत मलेशियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी मलेशियाच्या 5.2 षटकात 2 बाद 16 धावा झाल्या होत्या. पावसाने बराचकाळ उसंत न दिल्याने अखेर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे लावण्यात आला. त्यात भारताने 30 धावांनी सामना जिंकला.

आशिया कप महिला क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना मलेशियाशी झाला. नाणफेक जिंकून मलेशियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय सलामीवीर मेघना आणि शेफाली वर्मा यांनी फोल ठरवला. या दोघींनी 116 धावांची दमदार सलामी दिली. या सलामीच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली.

स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या साभिनेनी मेघनाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आक्रमक वृत्तीची शेफाली वर्माने तिला साध देण्याची भुमिका स्विकारली. मेघनाने 53 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. तिने शेफाली वर्मासोबत 116 धावांची सलामी दिली. दुसऱ्या बाजूने शेफाली वर्माने देखील 39 चेंडूत 46 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली.

मेघना 116 धावा झाल्या असताना बाद झाली. त्यानंतर शेफालीने भारताला 150 च्या पार पोहचवले. शेफाली 19 व्या षटकात बाद झाली. दरम्यान, रिचा घोषने 19 चेंडूत आक्रमक 33 धावांची खेळी करत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले. हेमलताने 4 चेंडूत 10 धावांची छोटेखानी खेळी करत हातभार लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hadapsar Bomb CCTV footage : हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा सीसीटीव्हीत कैद , 'महत्वाचे धागेदोरे हाती' पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

Virat Kohli Century: IPL मध्ये विराटच शतकांचा 'किंग'! KKR विरुद्ध केलेल्या १०५ धावांनी घडवला इतिहास, पाहा काय केलाय विक्रम

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

Panic Button Rule : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता प्रत्येक टॅक्सी, कॅब, बसमध्ये असणार GPS आणि पॅनिक बटण; नसेल तर परवाना होणार रद्द

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

SCROLL FOR NEXT