Women's Asia Cup T20 Indian Women's Cricket Team Reached In Final esakal
क्रीडा

Women's Asia Cup T20 : टीम इंडिया जिंकली! भारत-पाकिस्तान फायनल होणार?

अनिरुद्ध संकपाळ

India Women vs Thailand Women : महिला आशिया कपच्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने थायलंडचा 74 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने थायलंडसमोर 149 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र थायलंडला 20 षटकात 9 बाद 74 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून दिप्ती शर्माने 3 तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स घेतल्या. फलंदाजीत शफाली वर्माने 42 धावांची तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 36 धावांची खेळी केली. आता 15 ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला हा श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.

भारताने दमदार मारा करत थायलंडला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले होते. त्यानंतर थायलंडची धावगती मंदावली. याचा फायदा उचलत भारताने 63 धावात थायलंडचा निम्मा संघ माघारी धाडला. भारताने थायलंडच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडल्यानंतर त्यातून थायलंडचा डाव सावरलाच नाही. थायलंडने पुढच्या तीन षटकात 10 धावात चार फलंदाज गमावले. अखेर थायलंडचा डाव 20 षटकात 9 बाद 74 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून दिप्ती शर्माने भेदक मारा करत 4 षटकात 7 धावा देत 3 बळी टिपले. तिला राजेश्वरी गायकवाडने 10 धावात 2 बळी घेत चांगली साथ दिली. रेणुका सिंह, शफाली वर्मा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.

तत्पूर्वी, थायलंडने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवर प्लेमध्ये स्मृती मानधना 14 चेंडूत 13 धावा करत बाद झाली. त्यानंतर 10 व्या षटकात 28 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी करणारी शफाली वर्मा देखील बाद झाली. दोन्ही सलामीवीर बाद झाले त्यावेळी भारताच्या 67 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जने 26 चेंडूत 27 धावा करत भारताला शतकी मजल मारून दिली. मात्र भारताला 11 ते 20 षटकात आपली धावगती वाढवता आली नाही. कर्णधार हरनप्रीत कौरने देखील 30 चेंडूत 36 धावा केल्या. हरमन 18 व्या षटकात बाद झाली. त्यानंतर पूजा वस्त्रकारने 13 चेंडूत नाबाद 17 धावा करत भारताला 148 धावांपर्यंत पोहचवले. रिचा घोष 5 चेंडूत 2 तर दिप्ती शर्माने 5 चेंडूत 3 धावा करत निराशा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT