क्रीडा

Asia Team Championships : महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला

भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. पी. व्ही. सिंधू, अश्‍मिता छलीहा यांनी एकेरीत, तर तनीषा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा या जोडीने दुहेरीत विजय

सकाळ वृत्तसेवा

शाह आलम (मलेशिया) : भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. पी. व्ही. सिंधू, अश्‍मिता छलीहा यांनी एकेरीत, तर तनीषा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा या जोडीने दुहेरीत विजय मिळवताना भारतीय महिला संघाला हाँगकाँगवर ३-० असा विजय मिळवून दिला.

या विजयासह भारतीय महिला संघाने आशियाई बॅडमिंटन सांघिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील पदकही पक्के झाले. भारतीय महिला संघाचे प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

भारत-हाँगकाँग यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगली. पहिल्या एकेरीच्या लढतीत पी. व्ही. सिंधू हिने लो सिन यान हिच्यावर २१-७, १६-२१, २१-१२ असा तीन गेममध्ये विजय मिळवत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

तनीषा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा या जोडीने येऊंग टिंग-येऊंग लॅम या जोडीवर २१-१०, २१-१४ असा सहज विजय साकारला. अश्‍मिता छलीहा हिने एकेरीच्या लढतीत येऊंग यी हिच्यावर २१-१२, २१-१३ अशी मात केली. भारतीय संघाने पहिल्या तीन लढतींत विजय मिळवल्यानंतर पुढील दोन लढती खेळवण्यात आल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT