क्रीडा

WPL 2023: हे आवडत नाही मात्र.. WPL बाबत पाकिस्तानची कर्णधार मारूफचे मोठं वक्तव्य

भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मात्र...

सकाळ डिजिटल टीम

भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मात्र, पाकिस्तान महिला संघाला या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. जगातील सर्वात मोठ्या महिला टी 20 लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी आज मेगा लिलाव पार पडत आहे. मात्र, यामध्ये पाकच्या महिला संघाला स्थान नाही. यामुळे पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने खंत व्यक्त केली आहे. (Womens Premier League auction 2023 Bismah Maroof Pakistan Women cricket team )

महिला टी 20 लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी सुरु असलेल्या लिलावात भारतीय खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडला. पण पैसे सोडा, मैदानात उतरण्याची संधीही पाकिस्तानला नाही. यावर भाष्य करताना कर्णधार मारूफने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाली कर्णधार मारुफ?

'आम्ही पाकिस्तान म्हणून, तुम्हाला माहिती आहे की आम्हाला लीगमध्ये खेळण्याच्या फारशा संधी मिळत नाहीत. ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. आणि जे आमच्यासोबत घडतय ते आम्हाला आवडत नाही. आणि साहजिकच आम्हाला लीगमध्ये मिळालेली प्रत्येक संधी खेळायला आवडेल, परंतु आम्ही कोणत्या गोष्टी ठरवु शकत नाही.

वुमन प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामात पाच संघ आहेत. आज या 5 फ्रेंचायजी आपल्या संघाला मूर्त स्वरूप देणार आहे. लिलावासाठी सर्वोच्च बेस प्राईस ही 50 लाख ठेवण्यात आली असून प्रत्येक संघाला 12 कोटी रूपये खर्च करण्याची मुभा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT