WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women esakal
क्रीडा

WPL DCW vs MIW : मुंबईने 15 व्या षटकातच पार केले दिल्लीचे आव्हान, जिंकला सलग तिसरा सामना

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने आपली जुनी परंपरा तोडली. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्लीचे 106 धावांचे आव्हान मुंबईने 15 षटकात पार करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. मुंबईकडून सलामीवीर यस्तिका बाटियाने 41, हेली मॅथ्यूजने 32 तर नॅट सिवर ब्रंटने नाबाद 23 धावा केल्या.

तत्पूर्वी, अव्वल स्थानासाठी होत असलेल्या मुंबई - दिल्ली सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने 105 धावात गुंडाळत सामन्यावर पकड निर्माण केली. मुंबईने पॉवप्लेमध्येच टिच्चून मारा करत दिल्लीला थोपवले. मुंबईकडून सैका इशाकने 13 धावात 3, इसी वँगने 10 धावात 3 आणि हेली मॅथ्यूजने 19 धावात 3 विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक 43 तर जेमिमाह रॉड्रिग्ज तर 25 धावा केल्या.

47-0 (6 Ov) : मुंबईची पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात 

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी मुंबईला पॉवर प्लेमध्ये 47 धावांपर्यंत पोहचवले.

84-7  : आधी इशाक आता हेली 

दिल्लीला आधी सैका इशाकने एका पाठोपाठ एक धक्के दिले. त्यानंतर ऑफ स्पिनर हेली मॅथ्यूजने एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के देत त्यांची अवस्था 5 बाद 84 वरून 7 बाद 87 अशी केली.

81-4 : दिल्लीचे पाय खोलात

इशाकने शफाली वर्मा आणि पूजा वस्त्रकारने एलिस कॅप्सीची विकेट घेत दिल्लीची अवस्था 2 बाद 24 अशी केली होती. त्यानंतर वँगने माझीराने कापचा त्रिफळा उडवला. यानंतर मात्र कर्णधार मेग लेनिंग आणि जेमिमाह रॉड्रिग्जने भागीदारी रचत संघाला 13 षटकात 81 धावांपर्यंत पोहचवले. मात्र इशाकने जेमिमाहला 25 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

23-1 (5 Ov) : दिल्लीची संथ सुरूवात 

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्ये चांगलेच जखडून टाकले. मुंबईची फिरकीपटू सैका इशाकने शफाली वर्माचा 2 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर दिल्लीची धावगती मंदावली. त्यांना 5 षटकात 25 धावांपर्यंतच मजल मारता आली.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांना पोषक असते. त्यात बाऊंड्री देखील जवळ आहे.

वर्चस्वाची लढाई

दिल्ली कॅपिटल्स आज मुंबई इंडियन्सचे अव्वल स्थान हिसकावून घेण्यासाठी जोर लावले. तर मुंबई आपल्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी खेळेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video : पुण्यात भीषण अपघात ! फरश्या घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची तीन वाहनांना धडक, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पुत्रांचा आज भाजपमध्ये प्रवेश

IND vs AUS 1st T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून: भारत-ऑस्ट्रेलिया लढत Live कुठे पाहाल, जाणून घ्या वेळ

Tulsi Vivah 2025: यंदा तुळशीचे लग्न 2 कि 3 नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

CM Devendra Fadnavis: बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात ११ हजार कोटी जमा होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT