पुणे : स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझरने दिप्ती शर्माच्या व्हिलॉसिटीला 16 धावांनी पराभूत केले. मात्र ट्रेलब्लेझर जरी आजचा सामना जिंकली असली तरी त्यांना फायनल मात्र गाठता आली नाही. कारण व्हिलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर यांचे समान गुण झाले आहेत. त्यामुळे चांगल्या रनरेटच्या आधारावर व्हिलॉसिटीने फायनलमध्ये प्रवेश केला. आजच्या सामन्यात ट्रेलब्लेझरने एस मेघनाच्या 73 तर जेमिमाह रॉड्रिग्जच्या 66 धावांच्या जोरावर 20 षटकात 190 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना व्हिलॉसिटीला 20 षटकात 9 बाद 174 धावांपर्यंतच मजल मारता आली. व्हिलॉसिटीकडून किरन नवगिरेने सर्वाधिक 69 धावा केल्या. (Womens T20 Challenge Smriti Mandhana Trailblazers Defeat Velocity but Can't Reach In Finals)
ट्रेलब्लेझरने ठेवलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना व्हिलॉसिटीने देखील आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. यस्तिका भाटियाने 15 चेंडूत 19 धावा तर शेफाली वर्माने 15 चेंडूत 29 धावा केल्या. मात्र सलमा खातूनने यस्तिकाला तर राजेश्वरी गायकवाडने शेफालीला बाद करत व्हिलॉसिटीला दोन धक्के दिले.
त्यानंतर किरण नवगिरेने डाव सावरत लॉला वूलफार्टबरोबर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 10 व्या षटकातच शतकी मजल मारून दिली. मात्र पूनम यादवने लॉराला 17 धावांवर बाद करत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचणाऱ्या किरण आणि लॉराची जोडी फोडली.
व्हिलॉसिटीच्या वरच्या फळीने भागीदारी रचत संघाला 10 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र त्यानंतर ट्रेलब्लेझरच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. किरण नवगिरेने झुंजार खेळी करत 69 धावा केल्या. अखेर ट्रेलब्लेझरने व्हिलॉसिटीला 20 षटकात 9 बाद 174 धावात रोखले. ट्रेलब्लेझरने सामना 16 धावांनी जिंकला.
महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात व्हिलॉसिटीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रेलब्लेझरची कर्णधार स्मृती मानधनला स्वस्तात माघारी धाडून चांगली सुरूवात केली. स्मृती मानधना अवघ्या 1 धावेची भर घालून माघारी परतली. तिला केट क्रॉसने बाद केले.
मात्र त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि एस. मेघना यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. या दोघींनी केलेल्या 113 धावांच्या भागीदारीमुळे संघ मोठी धावसंख्या उभारू शकला. मेघनाने 47 चेंडूत 73 धावांची खेळी केली. तर रॉड्रिग्जने 44 चेंडूत 66 धावा केल्या. मात्र स्लॉग ओव्हर सुरू होण्यापूर्वीच या दोघीही बाद झाल्या.
यानंतर हेली मॅथ्यूज आणि डंक्ले यांनी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मॅथ्यूजने 16 चेंडूत 27 धावा केल्या तर डंक्लेने 8 चेंडूत 19 धावा चोपल्या. या दोघींच्या खेळीमुळे ट्रेलब्लेझरने 190 धावांपर्यंत मजल मारली. व्हिलॉसिटीकडून सिमर बहादूरने 2 तर क्रॉस, स्नेह राणा आणि खाका यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.