womens t20 world cup 2023 pakistan out of world cup after beat west indies india women team semi final scenario  
क्रीडा

WT20 WC 23: पाकच्या हारमध्ये भारताची जीत! पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर? काय आहेत भारताची समीकरणं

पाकिस्तानच्या या पराभवामुळे भारताने उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण सोपे पण...

Kiran Mahanavar

Women's T20 World Cup 2023 : ICC महिला T20 विश्वचषक 2023 हंगामात अप्रतिम सामने पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजकडून 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा दुसरा पराभव आहे, याआधी टीम इंडियाकडून पराभव झाला होता.

पाकिस्तानच्या या पराभवामुळे भारताने उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण आणखी सोपे झाले आहे. टीम इंडियाला आज ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे, हरमनप्रीत कौर अँड कंपनी हा सामना जिंकून इंग्लंडसोबत ग्रुप-बी मधून उपांत्य फेरीत प्रवेश करेल. जर आज आयर्लंडने भारताला मोठ्या अपसेटमध्ये पराभव केला, तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील.

ग्रुप-बी च्या पॉइंट टेबलवर एक नजर टाकली तर, विजयाची हॅट्ट्रिकसह इंग्लंड पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ 4-4 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचे आतापर्यंत दोन गुण झाले असून चौथ्या स्थानावर आहे. आयर्लंडला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि तो आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

भारताला महिला टी-20 विश्वचषक 2023च्या उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना आयर्लंडवर कोणत्याही परिस्थितीत विजय नोंदवावा लागेल. जर टीम इंडिया आज आयर्लंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरली तर त्यांचे 6 गुण होतील आणि ते इंग्लंडसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

जर आयर्लंडने जबरदस्त अपसेट खेचून भारताचा पराभव केला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील. या पराभवानंतर टीम इंडिया 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहील. अशा स्थितीत पाकिस्तानला शेवटचा सामना जिंकून 4 गुण गाठण्याची संधी असणार आहे. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करतील कारण त्यांचा निव्वळ रनरेट भारतापेक्षा चांगला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT