Womens World Cup 2022 Australia Break Rahul Dravid led Team Indias record  Sakal
क्रीडा

ऑस्ट्रेलियन महिला संघानं मोडला द्रविडच्या टीम इंडियाचा रेकॉर्ड

सकाळ डिजिटल टीम

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup) ऑस्ट्रेलिया संघाने आपली विजयी मालिका कायम राखली. मेग लेनिंग (Meg Lanning) च्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा विक्रम मोडीत काढला. (Australia Break Rahul Dravid led Team Indias record) ऑस्ट्रेलियन महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धचा सामना जिंकत खास विक्रमाला गवसणी घातली. आफ्रिकेनं दिलेले 271 धावांचे लक्ष्य 5 विकेट राखून पार करत ऑस्ट्रेलियन महिलांनी स्पर्धेतील सलग सहाव्या विजयाची नोंद केली.

2018 पासून आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने मिळवलेला हा सलग 18 वा विजय आहे. याआधी धावांचा पाठलाग करताना सलग 17 विजय मिळवण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या नावे होता. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2005-06 मध्ये धावांचा पाठलाग करताना सलग 17 सामने जिंकले होते.

मेग लेनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन महिला संघाने सेमी फायनलचे तिकीट आधीच बूक केले आहे. आपला दबदबा कायम राखत त्यांनी आणखी एका विजयाची नोंद केली. भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या तीन धावाने शतकाला हुलकावणी मिळाल्यानंतर मेग लेनिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 135 धावांची दमदार खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कॅप्टनने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. Laura Wolvaardt हिने केलेल्या 90 धावा आणि सुने लुईसच्या 51 चेंडूतील 52 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित 50 षटकात 271 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 14 धावांवर एलिसा हिली 5 धावा करुन तंबूत परतली. त्यानंतर मेग लेनिंगनं 130 चेंडूत नाबाद 135 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT