Smriti Mandhana  Sakal
क्रीडा

Women's World Cup : कांगारुंना भिडण्यापूर्वी स्मृती म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघासमोर आता बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असणार आहे. 19 मार्चला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत पाहायला मिळेल. सलग चार विजयासह ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय महिला संघ 4 पैकी 2 सामन्यातील विजयासह चौथ्या स्थानावर आहे.

याआधी 2017 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन फायनल गाठली होती. पण सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन संघ दमदार कामगिरी करताना दिसतोय. त्यामुळे भारतीय संघासमोर त्यांना पराभूत करुन खात्यात दोन अंक जमा करण्यासाठी मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघा विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची अनुभवी बॅटर स्मृती मानधना हिने डरकाळी फोडलीये. भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करावी लागेल, असे तिने म्हटले आहे.

स्मृती मानधना म्हणाली की, न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला अपयश आले. पण या मालिकेत भारतीय संघातील फलंदाजी कौतुकास्पदच होती. मागील चार सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सान्यात फलंदाजीतील तोरा पुन्हा दिसेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. सध्याच्या घडीला बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी होत आहे. बॉलिंग डिमार्टमेंटला सपोर्ट देण्याची मोठी जबाबदारी बॅटरवर असेल, असा उल्लेखही तिने केला.

ऑस्ट्रेलिया संघाने स्पर्धेतील चार पैकी चार सामन्यातील दमदार कामगिरीसह विजय नोंदवला आहे. भारतीय संघच त्यांना ब्रेक लावू शकतो. मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत पराभव स्विकारावा लागला होता. पण संघाने मेग लेनिंगच्या संघाचा सलग 26 सामने जिंकण्याचा सिलसिला थांबवला होता. वर्ल्ड कपमध्येही त्याची झलक पाहायला मिळाली तर भारतीय संघासाठी ती पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरीच ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT