FIFA Women's World Cup sakal
क्रीडा

FIFA Women's World Cup : महिलांचा विश्‍वकरंडक ब्राझीलमध्ये रंगणार;फिफाकडून शिक्कामोर्तब

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दिग्गज संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील या देशामध्ये २०२७ मधील महिलांच्या फुटबॉल विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. फिफाकडून या निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

बँकॉक : आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दिग्गज संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील या देशामध्ये २०२७ मधील महिलांच्या फुटबॉल विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. फिफाकडून या निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.

२०२७ मधील महिला विश्‍वकरंडकाच्या आयोजनासाठी चार ठिकाणांहून प्रयत्न करण्यात आले होते. ब्राझीलसह मेक्सिको व अमेरिका तसेच दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम, जर्मनी व नेदरलँड यांनी आयोजनासाठी कंबर कसली होती.

दक्षिण आफ्रिका व मेक्सिको-अमेरिका यांनी माघार घेतल्यामुळे ब्राझील व युरोपमधील देश यांच्यामध्ये थेट लढत झाली. फिफाशी संलग्न असलेल्या २०७ देशांनी मतदान केले. यामध्ये ब्राझीलने ११९ मतांसह विजय संपादन केला. युरोपियन देशांना ७८ मते मिळाली. त्यामुळे ब्राझीलला यजमानपदाचा मान मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT