Workload Management BCCI Appoint Paddy Upton as A Mental Conditioning Coach Of Team India esakal
क्रीडा

Paddy Upton : वर्कलोडची तक्रार करणाऱ्या खेळाडूंसाठी 'खास' प्रशिक्षकाची नियुक्ती

अनिरुद्ध संकपाळ

Paddy Upton Team India: भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) सध्या विश्रांतीच्या फेऱ्या सुरू आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार (Workload Management) संघातील वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने विश्रांती देण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) संघ ताजा तवाना रहावा यासाठी ही रणनिती आखली आहे. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या खराब कामगिरीचे एक कारण मानसिक थकवा असल्याचे देखील बोलले जात आहे.

दरम्यान, यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळाडूंचे मानसिक स्वास्थ चांगले रहावे. ते मानसिकदृष्ट्या ताजेतवाणे रहावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एका नव्या आणि खास प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या एक्सपर्टचे नाव पॅडी अप्टन (Paddy Upton) असून ते दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांना संघाचा मेटल कंडिशनिंग प्रशिक्षक (Mental Conditioning Coach) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. येथेच पॅडी अप्टन संघाशी जोडले जाणार आहेत. 53 वर्षीय पॅडी अप्टन हे 2011 मध्ये भारतीय संघाशी जोडले गेले होते. त्यावेळी संघाचे कोच गॅरी कर्स्टन होते. याच वर्षी भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला आहे.

टीम इंडियाचे टाईट शेड्युल

भारतीय संघ वेस्ट इंडीज विरूद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. तेथेच पॅडी अप्टन संघाशी जोडले जाणार आहेत. विंडीजबरोबरचा पहिला टी 20 सामना 29 जुलैला होणार आहे. त्यानंतर झिम्बावे दौरा झाल्यावर भारतीय संघ आशिया कप आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप देखील खेळणार आहे. बीसीसीआय वर्कलोडचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी पॅडी अप्टन यांना संघात सामिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

द्रविडच्या सुचनेवरून नियुक्ती

क्रिकबझने दिलेल्या वृत्तात सांगण्यात आले आहे की पॅडी अप्टन यांची मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून सपोर्ट स्टाफमध्ये झालेली नियुक्ती ही राहुल द्रविडच्या सल्ल्यानुसार झाली आहे. या दोघांनी 2010 मध्ये एकत्र काम केले आहे. पॅडी यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाकडून काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT